अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी RBIनं चलन छपाई करावी - उदय कोटक

बाजारात मागणी टिकून रहावी तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गरिबांना सरकारनं थेट मदत द्यावी
RBI
RBIGoogle file photo

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मध्यवर्ती बँकेनं (RBI) अधिक चलन छापण्याची आता वेळ आली आहे, असं भाष्य भारतातील टॉप खासगी बँकर उदय कोटक यांनी केलं आहे. अर्थव्यवस्थेचा विकास पुढेच सुरुच रहावा यासाठी अर्थव्यवस्थेला स्टेरॉईडची गरज असल्याचंही कोटक यांनी म्हटलंय. उदय कोटक (Uday Kotak) हे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसेच कन्फेडरेशन ऑप इंडियन इंडस्ट्रीचे (CII) अध्यक्षही आहेत. कोटक यांनी बुधवारी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती आणि त्यावरील उपाययोजना यांबाबत माहिती दिली. (RBI needs to print money to save Indian economy CII chief Uday Kotak)

RBI
लस आयातीबाबत व्यवस्थित राष्ट्रीय धोरणं आखायला हवं - राजेश टोपे

कोटक म्हणाले, "आर्थिक पिरॅमिडमधील सर्वात खालच्या स्तरातील लोकांसाठी सरकारनं मदत कारायला हावी. गरिबांतील गरीब लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खर्च द्यायला हवा. तसेच त्यांना थेट वैद्यकीय सुविधा पुरवायला हव्यात. त्याचबरोबर मनरेगा सारख्या योजना अधिक सक्षम करायला हव्यात. गरीबांच्या हातात रोख रक्कम असल्यास त्यामुळे बाजारातील ग्राहक मागणी टिकून राहिल जी सध्या स्थिर नाही."

RBI
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताची मदत ठरणार कारणीभूत?

रिझर्व्ह बँकेच्या पाठिंब्याने (वित्तीय वर्षातील) देशाचा ताळेबंद वाढविण्यास सक्षम होण्याची हीच वेळ आहे. तसेच RBIच्या विस्तारित ताळेबंदातील काही भागाला वित्तपुरवठा करण्यात यावा, यासाठी प्रसंगी बाजारातून कर्जही घ्यावं,” असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, अशा प्रकारच्या वित्तीय उत्तेजनाचा अर्थ असा होतो की, RBI चा ताळेबंद विस्तृत होईल. ज्यामध्ये चलनाच्या छपाईला आर्थिक विस्तार म्हणून ओळखलं जाईल. सध्या आपल्याला यांपैकी काहीतरी करणं गरजेचं आहे. या काळात आपल्याला विकासाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, अशी भूमिका कोटक यांनी मांडली.

भारताची अर्थव्यवस्था आकुंचन पावली

भारताची अर्थव्यवस्था गेल्या वित्तीय वर्षात सुमारे ७ ते ८ टक्क्यांनी अकुंचन पावली आहे. तर या आर्थिक वर्षात देशात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी अर्थिक वाढीचा दर १० टक्क्यांनी वाढत होता, जो जगात सर्वाधिक होता. पण कोरोनाच्या उद्रेकानंतर अर्थतज्ज्ञांनी वाढीच्या वेगाचा अंदाज सातत्यानं कमी ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com