रिलायन्सने वर्षभरात 75 हजार नोकऱ्या दिल्या - मुकेश अंबानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिलायन्सने वर्षभरात 75 हजार नोकऱ्या दिल्या - मुकेश अंबानी

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्यांना गमावलं आहे. अशा कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहे. कोरोना असुनही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये RIL ची कामगिरी चांगली राहिली असल्याचंही अंबानींनी सांगितलं.

Live

रिलायन्सने वर्षभरात 75 हजार नोकऱ्या दिल्या - मुकेश अंबानी

मुंबई - देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची 44 वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु झाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरु असलेल्या बैठकीत रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी कंपनीच्या भागधारकांशी संवाद साधत आहेत. यावेळी मुकेश अंबानींसोबत आकाश अंबानी, इशा अंबानी आणि नीता अंबानी हे आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

मुकेश अंबानी म्हणाले की,'आम्ही देशाची काळजी करतो, कर्मचाऱ्यांची चिंता आहे. कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी, भागधारकांनी कोरोनाचा सामना केला आहे. कोरोनामुळे कुटुंबातील सदस्यांना गमावलं आहे. अशा कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहे. कोरोना असुनही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये RIL ची कामगिरी चांगली राहिली असल्याचंही अंबानींनी सांगितलं.

रिलायन्सचा Solar Photovoltaic गिगा फॅक्टरीचा मेगा प्लॅन असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. यामध्ये सौर उर्जा निर्माण केली जाईल. पंतप्रधान मोदींकडून यासाठी प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी देशात रिन्यूवेबल एनर्जी क्षमता ही 450 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनाने सर्वत्र आव्हानात्मक परिस्थिती होती. अशा काळातही कंपनीने चांगली कामगिरी केली असून जवळपास 5 लाख 40 हजार कोटींची उलाढाल केली. एकत्रित निव्वळ उत्पन्न हे 98 हजार कोटी इतकं होतं असं मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सने गेल्या वर्षभरात 75 हजार नव्या नोकऱ्या दिल्याचंही मुकेश अंबनी म्हणाले.

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनी भागधारकांना संबोधित करताना सांगितलं की, रिलायन्स आज देशातील 11 टक्के मेडिकल ऑक्सिजन तयार करते. रिलायन्सने पाच महत्त्वाची मिशन लाँच केली. त्यामध्ये मिशन ऑक्सिजन, मिशन कोविड इन्फ्रा, मिशन अन्न सेवा, मिशन एम्प्लॉइ केअर आणि मिशन व्हॅक्सिन सुरक्षा यांचा समावेश आहे.

हेही वाचा: वॉरेन बफेंकडून 30 हजार कोटींचे दान; म्हणाले आतापर्यंत फक्त अर्धी संपत्ती दिली

याआधीच्या सर्वसाधारण सभेपासून आतापर्यंत उद्योगात अपेक्षापेक्षा जास्त वाढ झाली आहे. मात्र, याहून अधिक आनंद या गोष्टीचा आहे की, कठीण काळात लोकांच्या सेवेसाठी अनेक प्रकारची मदत करता आली. रिलायन्सने कोरोनाच्या या संकटात उत्कृष्ट असं काम केलं आहे. आपल्या कामावर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष धीरुभाई अंबानी यांनाही गर्व वाटत असेल असं अंबानी म्हणाले.

Web Title: Reliance Agm 2021 Live Updates Mukesh Ambani Jio 5g Phone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India