रिलायन्स 27 हजार कोटींमध्ये विकत घेणार फ्युचर उद्योग समूह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

मॉर्गन स्टेनलीच्या मते रिलायन्स रिटेलची व्हॅल्यू 29 अब्ज डॉलर्स आहे. तसंच रिलायन्सची मार्केट व्हॅल्यू वाढत आहे. सध्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 14.41 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठा उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रिज फ्युचर उद्योग समूहाचे रिटेल व्यवसाय खरेदी कऱण्याची शक्यता आहे. रिलायन्सकडून फ्युचर उद्योग समूहाचे युनिट 24 हाजर ते 27 हजार कोटी रुपयांपर्यंत खरेदी करू शकते. यामुळे रिलायन्सच्या रिटेल सेक्टरची ताकद आणखी वाढेल. जर रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमध्ये डील झाले तर फ्युचर रिटेलचं कर्जसुद्धा रिलायन्स फेडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

मनी कन्ट्रोलच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स आणि फ्युचर यांच्यात डील होण्याआधी फ्युचर उदोयग समूहाच्या पाच कंपन्यांचे विलिनिकरण होणार आहे. यामध्ये फ्युचर रिटेल लिमिटेड, फ्युचर कन्झ्युमर, फ्युचर लाइफस्टाइल फॅशन, फ्युचर सप्लाय चेन आणि फ्युचर मार्केट नेटवर्क्स यांचा समावेश आहे. या पाच कंपन्या फ्युचर इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये विलिन केल्या जातील. फ्युचर इंटरप्रायजेस कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करते. 

हे वाचा - सोने, चांदी उजळले; भाव प्रतितोळा ५२ हजारांच्या वर

रिलायन्सकडे 31 जुलैपर्यंत या डीलसाठी 31 जुलैपर्यंत वेळ असल्याचंही म्हटलं जात आहे. बायडिंग अॅग्रीमेंटनुसार रिलायन्सला 31 जुलैच्या आधी हे डील करायचं आहे. अजुनही दोन्ही उद्योग समुहामध्ये चर्चा होत आहे. या डीलसाठी वेळ लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. फ्युचर समुहाशी डील झाल्यास बिग बाझार, फूडहॉल, निलगिरी, एफबीबी, सेंट्रल, हेरिटे फूड्स आणि ब्रँड फॅक्टरी हे सर्व रिलायन्सचे होईल. रिलायन्सला ली कूपर सारखा ब्रँड आणि एकूण 1700 स्टोअर्ससुद्धा मिळतील. 

रिलायन्स आणि फ्युचर उद्योग समुहाम्ये फ्युचर रिटेलच्या व्हॅल्युएशनबाबत एकमत झालेलं नाही. गेल्या आठवड्यात एका बॉन्डचे व्याज भरण्यामध्ये झालेल्या चुकीमुळे फ्युचर रिटेलवर लिक्विडिटी दबाव वाढला आहे. त्यामुळे समुहाच्या क्रेडिट रेटवरही परिणाम झाला. प्रमोटर्सची फ्युचर रिटेलमध्ये 2 टक्के भागिदारी आहे. यांच्याकडूनच हायपर मार्केट चेन बिग बाझार आणि किराणा चेन इझीडे क्लब चालवले जातात. या डीलमधून रिलायन्सचा भारतीय रिटेल सेक्टरमध्ये त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा इरादा आहे. 

हे वाचा - 'पेनी स्टॉक्‍स' घेताय? सावधान!

रिटेल सेक्टरमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही फॉरमॅटमध्ये आहे. फ्युचरसोबतच्या डीलनंतर रिलायन्स त्यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये जागतिक भागिदारी आणि गुंतवणूक दारांना आणेल. मॉर्गन स्टेनलीच्या मते रिलायन्स रिटेलची व्हॅल्यू 29 अब्ज डॉलर्स आहे. तसंच रिलायन्सची मार्केट व्हॅल्यू वाढत आहे. सध्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 14.41 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance may buy future group s retail in 27000 crore