
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या राईट इश्यूची शेअर बाजारात जबरदस्त नोंदणी झाली आहे. रिलायन्सच्या राईट इश्यू शेअरची 690 रुपयांवर नोंदणी झाली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या "बेस प्राईस'च्या 646 रुपयांच्या तुलनेत 690 रुपयांवर नोंदणी झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या राईट इश्यूची शेअर बाजारात जबरदस्त नोंदणी झाली आहे. रिलायन्सच्या राईट इश्यू शेअरची 690 रुपयांवर नोंदणी झाली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या "बेस प्राईस'च्या 646 रुपयांच्या तुलनेत 690 रुपयांवर नोंदणी झाली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रिलायन्स इंडस्ट्रीजचा राईट्स इश्यूला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचा इश्यू 1.5 टक्के "ओव्हरसबस्क्राईब' झाला होता.
रिलायन्सचा राईट इश्यू 20 मे ते 3 जून 2020 पर्यंत खुला होता. या कालावधीत विद्यमान शेअरधारकांना राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार होती. कंपनीने 14 मे "रेकॉर्ड डेट' म्हणून जाहीर केली होती. विद्यमान गुंतवणूकदारांना 15 शेअरमागे एक शेअर या प्रमाणात 1257 रुपयांना नवीन शेअर देण्यात आला होता. कंपनीने राईट इश्यूच्या माध्यमातून सुमारे 53 हजार 125 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. या माध्यमातून एकूण 42 कोटी 26 लाख शेअरची विक्री करण्यात येणार आहे.
'ही' महत्त्वाची कामे करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले वाचा सविस्तर..
मुकेश अंबानींची 49.14 टक्के हिस्सेदारी
राईट इश्यूनंतर मुकेश अंबानींची रिलायन्समधील हिस्सेदारी 49.14 टक्क्यांवर पोचली आहे. मुकेश अंबानी कुटुंबियांनी राईट इश्यूमध्ये 28 हजार 286 कोटी रुपये ओतले आहे. रिलायन्सचा राईट इश्यूची RELIANCEPP या नावाने शेअर बाजारात नोंदणी झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे 25.4 लाख लहान गुंतवणूकदार (रिटेल शेअरहोल्डर) आहेत. तर 1700 संस्थात्मक गुंतवणूकदार (इन्स्टिट्युशनल) आहेत.