Home Loan Documents: कर्ज फेडल्यानंतर हे महत्त्वाचे काम करायला विसरू नका; नाहीतर होईल पश्चाताप...

कर्ज फेडल्यावर एक महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचीही तूमची जबाबदारी असते. ती तुम्ही विसरलात तर एक साधी गोष्ट तूमची डोकेदुखी बनू शकते
Home Loan Documents
Home Loan Documentsesakal

Home Loan Documents: एकाद्या गोष्टीसाठी कर्ज घेतल्यानंतर ते पूर्ण परत करेपर्यंत अनेकांच्या डोळ्याला झोप नसते. महिनाअखेरी कर्जाचा हफ्ता बाजूला काढत कर्ज फेडलं जातं. कर्ज फेडल्यावर लोक सुटकेचा श्वास घेतात. पण, कर्ज फेडल्यावर एक महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचीही तुमची जबाबदारी असते. ती तुम्ही विसरलात तर तुमची डोकेदुखी वाढू शकते.

ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर बँक तूम्हाला क्लोजर लेटर देते. हे प्रमाणपत्र म्हणजे तूमचे कर्ज फिटल्याचा दाखला असतो. पण, या व्यतिरीक्तही तूम्हाला आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे बँकेकडे मागण्याची गरज आहे. जर तूम्ही घरासाठी कर्ज काढले असेल तर बँकेचे कर्ज फेडल्यावर घराची खरी कागदपत्रे बँकेकडून मागून घ्या.

Home Loan Documents
Home Loan : तुमच्या सणांच्या खर्चाचे व्यवस्थापन करा - तुमचे गृहकर्ज कमी करण्याचे मार्ग

तूम्ही जोवर कर्ज फेडत नाही तोवर ते महत्त्वाची कागदपत्रे बँकेकडे जमा असतात. आणि कर्ज फेडल्यावर ती तूम्हाला परत केली जातात. यामध्ये एलॉटमेंट लेटर, पजेशन लेटर,सेल डीड यांचाही समावेश असतो.

जर तुम्ही कर्जाची परतफेड केल्यानंतर बँक तूम्हाला नो ड्यूज सर्टीफिकेट देते. सर्व हफ्ते भरून तूम्ही कर्ज फेडले असल्याचा तो दाखला असतो. कर्ज फेडस्यावर तुमचे क्रेडिट प्रोफाइल अपडेट केल्याची खात्री करा. जर तुम्हाला भविष्यात कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. कर्ज बंद करताना हे काम केले नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासत राहा. पण लगेचच तुमचे क्रेडिट प्रोफाइल अपडेट करण्याचा प्रयत्न करा.

Home Loan Documents
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

कर्जाची परतफेड केल्यानंतर नॉन-एन्कम्ब्रन्स प्रमाणपत्र दिले जाते. हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो. ज्यामध्ये परतफेडीचे सर्व तपशील असतात. तुमच्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज थकीत नसल्याचा हाही एक महत्त्वाचा पुरावा असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com