esakal | क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

credit card

क्रेडिट कार्डवरील सर्व सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल तुम्हाला बरंच काही सांगणारे मिळतील. पण जर तुम्ही व्यवस्थित सगळं समजून नाही घेतलं तर ते तुम्हाला नफ्याचे क्रेडिट कार्ड बरंच नुकसानकारक ठरु शकतं.

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जर कोणी तुम्हाला सांगितले की क्रेडिट कार्ड मोफत मिळत आहे आणि त्यावर कोणताच चार्ज नाही तर तो व्यक्ती चुकीची माहिती देतोय. कारण क्रेडिट कार्डवरील सर्व सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल तुम्हाला बरंच काही सांगणारे मिळतील. पण जर तुम्ही व्यवस्थित सगळं समजून नाही घेतलं तर ते तुम्हाला नफ्याचे क्रेडिट कार्ड बरंच नुकसानकारक ठरु शकतं. प्रत्येकाने क्रेडीट कार्डाच्या वापरापुर्वी त्यावर असलेल्या शुल्कांची माहिती घेणं महत्वाचं आहे. बऱ्याच शुल्कांचा उल्लेख बँका किंवा एजंटांकडूनही केला जात नाही. अशा काही  महत्त्वाच्या शुल्कांची माहिती जाणून घेऊया जी जाणून घेणं महत्वाचे आहे.

1. वार्षिक शुल्क-
या शुल्काचे दर बँक कोणती आहे यावर ठरतं. वेगवेगळ्या बॅंकांचे वेगवेगळ्या दराने वार्षिक शुल्क असतात. पण अशाही अनेक बँका आहेत जे हे शुल्क आकारत नाहीत, काही जण हे शुल्क आकारतात, पण जर तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर ते हे शुल्क परत करत असतात. त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले तर आधी पाहा की बँक दरवर्षी किती शुल्क आकारते. 

मोदी सरकार आणि सामान्यांसाठी खूशखबर, देशाच्या अर्थचक्राला येतेय गती

2. क्रेडिट कार्ड देयतेवरील व्याज-
बँका हे शुल्क क्रेडिट कार्डचे बिल वेळेत न भरणाऱ्यांवर आकारतात. जर तुम्ही तुमच्या ड्यू डेटपर्यंत पैसे भरले तर ठीक नाहीतर क्रेडिट कार्ड कंपनीकडून व्याज मोठ्या दराने व्याज आकारले जाते. 

3. रक्कम काढण्यासाठी लागणारे शुल्क-
क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी हे समजून घ्या की क्रेडिट कार्डवर खर्च होणारा प्रत्येक रुपया हे एक प्रकारचे कर्ज आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढली तर रक्कम काढण्याच्या दिवसापासून शुल्क आकारण्यास सुरुवात होईल. त्यामुळे गरज असेल तरच क्रेडीट कार्डचा उपयोग करावा असं सांगितले जाते.

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

4. सरचार्जकडेही लक्ष ठेवलं पाहिजे-
शक्यतो सगळ्या बॅंकांच्या क्रेडिट कार्डवर सरचार्ज लावला जातो. बऱ्याच बॅंका क्रेडिट कार्ड देताना सांगतात की, सरचार्ज हा रिफंडेबल आहे. पण अशी माहिती जर एखाद्या बॅंकेने नाही दिली तर त्याची शहानिशा करुन घ्यावी. 

5. ओवरसीज ट्रांजॅक्शन चार्ज-
क्रेडिट कार्ड देताना अनेक बँका सांगतात की तुम्ही क्रेडिट कार्ड परदेशातही वापरू शकता. पण त्याअगोदर हे लक्षात घेणे गरजेचे आहे की परदेशात क्रेडिट कार्डचा वापर करण्यासाठी मोठा चार्ज लागू शकतो. याचीही खात्रीही करून घ्यावी.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top