रेपो, रिव्हर्स रेपो जैसे थे; ‘आरटीजीएस’ २४ तास उपलब्ध होणार

RBI
RBI

मुंबई - रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज दिली. तसेच, ‘आरटीजीएस’ सुविधा डिसेंबरनंतर २४ तास उपलब्ध होणार आहे.  रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. पतधोरण समितीने रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के कायम ठेवला आहे. रेपो दरात बदल न झाल्याने कर्जांच्या व्याजदरात बदल होणार नाहीत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेपो दरात थोडा बदल होईल, अशी अपेक्षा यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. ऑगस्टमध्येही या दरात कोणताही बदल झाला नव्हता. फेब्रुवारी २०१९ पासून रेपो दरात २.५० टक्क्यांची मोठी कपात झालेली आहे.

गृहकर्जाच्या दरांवर लक्ष
दास म्हणाले, की रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही, परंतु गृहकर्जाचे दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. यासाठी, नव्या गृहकर्जावरील जोखीम ३१ मार्च २०२२ पर्यंत कमी केली गेली आहे. म्हणजेच भविष्यात देण्यात येणारे सर्व नव्या गृहकर्जांची जोखीम फक्त मूल्याच्या कर्जाशीच जोडली जाईल, म्हणजे कर्ज मिळविणे सोपे आणि स्वस्त होईल.

‘आरटीजीएस’ सुविधा २४ तास
‘रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट’ (आरटीजीएस) ही पैसे हस्तांतर करण्याची एक वेगवान प्रणाली आहे. ही सुविधा डिसेंबर २०२० नंतर आठवड्याचे सातही दिवस २४ तास उपलब्ध असेल. आरटीजीएस सेवा सध्या कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध असते. पैसे हस्तांतर करण्यासाठी हे एक अतिशय सुरक्षित व्यासपीठ आहे. ‘आरटीजीएस’ सामान्यतः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते.

‘जीडीपी’ सुधारण्याची आशा
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनवाढ (जीडीपी) ९.५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे, परंतु, चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च २०२१) ‘जीडीपी़ पासून सुधारणा दर्शवू शकेल. जगभरातील अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. आम्ही भविष्याबद्दल विचार करीत असून, सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती दिसून येत आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com