घराचे स्वप्न होतेय महाग

बांधकामासाठी साहित्याच्या दरात मोठी वाढ : युक्रेन युद्धाचा परिणाम
russia Ukraine war impact house expensive increase in price construction materials nanded
russia Ukraine war impact house expensive increase in price construction materials nandedsakal

नांदेड : अगोदरच शहरात व परिसरात प्लाॅटचे दर आवाक्याबाहेर गेलेत. त्यातच आता घर बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य महाग झाल्याने घराच्या स्वप्नांना आर्थिक झळ बसत आहे. बांधकाम तसेच मजुरी महाग होत असल्याने बांधकाम व्यावसायिकसुद्धा अडचणीत आले आहेत.मागील काही महिन्यांत स्टील, सिमेंट, विटा, वाळू, प्लॅस्टिक पाईप यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. मार्चमध्ये ५२ रुपयांना असणारे स्टील ८६ ते ९० रुपये प्रतिकिलोच्या घरात गेले आहे. स्टीलला लागणारे लोखंड हे युक्रेनहून येते.

तेथून येणाऱ्या कच्च्या मालाची आवक घटल्याने स्टीलसाठी लागणरा कच्च्या मालासाठी कंपन्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत असल्याने स्टीलचे दर वाढत आहे. तसेच प्लॅस्टिक पाईपच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

वीटभट्टीसाठी लागणारा कोळशाच्या दरात वाढ झालेली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कोळशाची टंचाईसुद्धा होती. परिणामी विटांच्या दरामध्ये दरवाढ झाली. कोरोना काळात परराज्यातील बांधकाम मजुरांचे हाल झाले होते. त्यानंतर परराज्यातील मजूर परत महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण काहीसे घटले. परिणामी मजुरी दर वाढत आहेत. मध्यप्रदेशात जवळपात पाच हजार मजूर नांदेडमध्ये काम करतात, ते होळीसाठी परत जातात. आता परत मजुरांची टंचाई भासण्याची शक्यता असल्याचे भाकित व्यावसायिकांनी वर्तविले आहे.

कोरोनाचे संकट दूर होत असतानाच बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट, वाळू, खडी, विटा यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याशिवाय बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डिझेलच्या किमतीतही मोठी दरवाढ झाली आहे. यामध्ये भरीत भर म्हणून वस्तू व सेवा कर परिषदेने बांधकाम साहित्यावरील करामध्ये ५ टक्क्यांवरून १८ टक्के म्हणजे तब्बल १३ टक्क्यांची वाढ केली. या मुळे बांधकामाच्या प्रति चौरस फूट खर्चामध्ये सरासरी ३०० रुपयांची वाढ झाली. साहजिकच बाजारात थोडीशी तेजी आल्याने आमच्यासारख्या व्यावसायिकांवर चिंता पसरली आहे.

- विशाल वाघमारे भाटापूरकर, बांधकाम व्यावसायीक.

बांधकाम साहित्य नोव्हेंबर मधील दर मार्च मधील दर

सिमेंट प्रतिगोणी २७० ३७०

स्टील सहा ते ३२ एमएम ४० ९०

वाळू प्रतिब्रास चार हजार सहा हजार ५००

आर्टिफिशियल वाळू दोन हजार ७०० तीन हजार ६००

अॅल्युमिनिअम १८० ३४०

पीव्हीसी पाईप १.७५ इंच ८० १५०

वीट सहा इंच आठ हजार १४ हजार

बांधकाम ठेकेदार प्रति स्क्वे. फिट २२० २७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com