SBI डेबिट कार्डवरुन करा EMIने खरेदी; जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI

SBI डेबिट कार्डवरुन करा EMIने खरेदी; जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी डेबीट कार्डवरुन ईएमआय सेवा सुरु केली आहे. त्यानुसार एसबीआय आपल्या ग्राहकांना पॉइंट ऑफ सेल (POS) वर स्वाइप करून खरेदी करण्याची सुविधा देणार आहे. तसेच ग्राहक एसबीआयचे डेबिट कार्ड वापरुन ऑनलाईन खरेदीमध्ये देखील या सुविधेचा वापर करु शकणार आहे.

एसबीआयच्या डेबिट कार्ड धारकांना या सुविधेचा लाभ घेता येणार असून त्यासाठी त्यांना काही तांत्रिक बाबींची पुर्तता करावी लागणार आहे. एसबीआय ग्राहकांना यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ५६७६७६ या क्रमांकावर DCEMI असा मेसेज करावा लागणार आहे. त्यानंतर आपण या सेवे साठी पात्र आहात की नाही हे समजणार आहे.

ऑफलाईन खरेदीसाठी DCEMI सुविधा कशी मिळणार.

 1. एसबीआयचे डेबिट कार्ड पीओएश मशीनमध्ये स्वाईप करा.

 2. ब्रँड ईएमआय, बँक ईएमआय हे पर्याय निवडा.

 3. खेरेदीची रक्कम टाका आणि रिपेमेंट टेनर पर्याय वापरा.

 4. आपला पीन कोड टाका आणि OK चा पर्याय निवडा त्यानंतर आपण सदरील व्यवहार या सुविधेसाठी पात्र आहे का हे तपासले जाईल

 5. आपण पात्र असल्यास हा व्यवहार पुर्ण होईल.

 6. चार्ज स्लीपमधून आपल्याला बीलाच्या रकमेसह अटी आणि शर्थींची माहिती मिळेल.

हेही वाचा: स्मार्ट गुंतवणूक : आपल्या पोर्टफोलिओत ‘एमएनसी फंड’ हवाच!

ऑनलाईन खरेदीसाठी DCEMI सुविधा कशी मिळणार

 1. आपल्या मोबईलवर ऑनलाईन शॉपींगसाठी अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा पात्र असलेली कुठलीही वेबसाईट सुरु उघडा

 2. आपल्याला विकत घ्यायचे असलेली वस्तू निवडा

 3. पेमेंटच्या वेगवेळ्या पर्यायांपैकी ईझी ईएमआय हा पर्याय निवडा आणि एसबीआय पर्यायावर क्लिक करा

 4. त्यानंतर त्या वस्तूची किंमत आल्यानंतर टेनर आणि प्रोसिड पर्यायावर क्लिक करा

 5. एसबीआय लॉगीन झाल्यानंतर इंटरनेट बँकिंगचा पर्याय निवडून, डेबिट कार्ड क्रिडेन्शिअल्सवर क्लिक करा.

 6. त्यानंर खरेदीचा व्यवहार पुर्ण होताच, ईएमआयच्या अटी आणि शर्थींची माहिती दिली जाईल.

हेही वाचा: शेअर मार्केट : बाजार अचानक पडला तर...

एसबीआय डेबिट कार्ड ईएमआय रक्कम 8,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत 2 वर्षांच्या MCLR व्याज दराने 7.50% आहे. जी सध्याच्या कर्जाच्या कालावधीत 14.70% आहे. कर्ज 6/9/12/18 महिन्यांच्या मुदतीसह उपलब्ध आहे.

Web Title: Sbi Convert Your Purchase Via Debit Card Into Emi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SBIemidebit card