SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना झटका! आता EMI व्यवहार महागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sbi

SBI क्रेडिट कार्ड वापरत आहात? आता EMI व्यवहार महागणार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : तुम्ही जर SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी समोर येत आहे. आता तुम्हाला एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या ईएमआय व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. जाणून घ्या सविस्तर....

ईएमआय व्यवहारांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार

SBICPSL रिटेल आउटलेट्स आणि अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारेल. हे शुल्क खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याज शुल्काव्यतिरिक्त आहेत. कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे नवीन शुल्काची माहिती दिली. SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने जाहीर केले आहे की, EMI व्यवहारांसाठी कार्डधारकाला आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क आणि त्यावर कर भरावा लागेल. हा नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

हेही वाचा: रझा अकादमीचा भाजप, संघावर हल्लाबोल; प्रमुख सईद नुरी म्हणाले....

1 डिसेंबरपासून लागू

1 डिसेंबरपूर्वी केलेल्या कोणत्याही व्यवहारास या प्रक्रिया शुल्कातून सूट दिली जाईल. रिटेल आउटलेटवर खरेदी करताना कंपनी कार्डधारकांना ईएमआय व्यवहारांवरील प्रक्रिया शुल्काची माहिती चार्ज स्लिपद्वारे देईल. ऑनलाईन ईएमआय व्यवहारांसाठी कंपनी पेमेंट पृष्ठावर प्रक्रिया शुल्काविषयी माहिती देईल. ईएमआय व्यवहार रद्द झाल्यास प्रक्रिया शुल्क परत केले जाईल. प्री-क्लोजरच्या बाबतीत ते परत केले जाणार नाही. ईएमआयमध्ये रूपांतरित केलेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत. EMI मध्ये यशस्वीरित्या रुपांतरित झालेल्या व्यवहारावर प्रक्रिया शुल्क लागू आहे.

हेही वाचा: "आझमगडचे नाव बदलून..."; CM योगी आदित्यनाथ यांचा इशारा

loading image
go to top