esakal | एसबीआयच्या खातेदारांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्स संदर्भात बँकेचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

sbi

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी मोठा निर्णय़ घेतला आहे.

एसबीआयच्या खातेदारांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्स संदर्भात बँकेचा मोठा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी मोठा निर्णय़ घेतला आहे. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार आता खात्यांवर मिनिमम बॅलन्स (किमान रक्कम) नसल्यास आणि एसएमएससाठीचे शुल्क आता आकारले जाणार नाही. हे शुल्क बँकेनं माफ केलं आहे. लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार एसबीआयने म्हटलं आहे की, बँकेच्या बचत खातेधारकांसाठी चांगली बातमी आहे. आता तुम्हाला एसएमएस सेवा किंवा महिन्याला किमान रक्कम खात्यावर नसेल तर शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे एसबीआयच्या 44 कोटींहून अधिक बचत खातेधारकांना याचा फायदा होणार आहे. 

हे वाचा - चर्चा चकाकत्या सोन्याची

एसबीआयच्या बचत खाते धारकांसाठी ही सुविधा मिळणार आहे. ज्यामध्ये इंटरनेट बँकिंग, चेकबुक असलेल्या खात्यांचाही समावेश आहे. एसबीआयने एका ट्विटमध्ये म्हटलं की, सर्व बचत खात्यांसाठी हे लागू असणार आहे. जे ग्राहक त्यांच्या बचत खात्यांवर अधिक रक्कम ठेवतात त्यांना मोफत एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देते. जर एखाद्या खातेधारकाच्या खात्यावर एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर त्या खातेधारकांना एका महिन्यात कितीही वेळा एटीएमवरून व्यवहार करता येतात. 

हे वाचा - सोन्याचे दर वाढण्याचं कारण काय? जाणून घ्या

मार्च महिन्यात बँकेनं त्यांच्या बचत खात्यांवरील सरासरी किमान रक्कमेचे निर्बंध हटवणार असल्याचे सांगितले होते. यामुळे आता बँकेच्या सर्व खाते धारकांना झिरो बॅलन्स सुविधा मिळणार आहे. याआधी बँकेला मेट्रो शहरांमध्ये बचत खातेधारकांना किमान रक्कम 3 हजार रुपये, लहान शहरांमध्ये 2 हजार रुपये तर ग्रामीण भागात 1 हजार रुपये खात्यावर ठेवावे लागत होते.