एका क्लिकवर वाचा, शेअर बाजारातील आजच्या महत्त्वाच्या 10 घडामोडी

टीम ई-सकाळ
Wednesday, 6 November 2019

दोन्ही निर्देशांकामध्ये आज तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स 40469.78 अंशांच्या पातळीवर तर, निफ्टी 11966.05 अंशांच्या पातळीवर स्थिरावले.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 221.55 अंशांची वाढ झाली तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48.85 अंशांनी वधारला. आज या दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उचांकी गाठली आहे. दोन्ही निर्देशांकामध्ये आज तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स 40469.78 अंशांच्या पातळीवर तर, निफ्टी 11966.05 अंशांच्या पातळीवर स्थिरावले.

आम्ही विरोधीपक्षात बसू : शरद पवार
भाजपविरहीत सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग

शेअर बाजारातील दिवसभरातील दहा महत्त्वाच्या घडोमोडींवर एक दृष्टिक्षेप 

  1. बॅंकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून आली, त्यामुळे बॅंक निफ्टी 389 अंशांनी वधारून 30,609 अंशांवर पोचला आहे.
  2. आज दिवसभरात तेजी असलेल्या कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बॅंकेचा शेअर 2.64 टक्के, इन्फोसिस 2.37 टक्के, एचडीएफसी 1.78 टक्के, इंड्सइंड बॅंक 1.74 टक्के आणि एचडीएफसी बॅंक 1.42 टक्क्यांनी वधारला आहे.
  3. ज्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली त्यात भारती एअरटेल 3.31 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.07 टक्के, बजाज फायनान्स 1.04 टक्के, ओएनजीसी 1.03 टक्के आणि मारुती 1 टक्क्याने घसरला आहे.
  4. कन्झ्युमर ड्युरेबल्सच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली.
  5. बीएसईमधील 1,224 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत तेजी होती तर 1,280 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे.
  6. बीएसईमध्ये रेमंड, वेस्टलाईफ, जाई कॉर्प, अवंती फिड्स, कॉर्पोरेशन बॅंक, जीएमआर इन्फ्रा या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती तर जीई टी अॅंड डी, टायटन, बजाज इलेक्ट्रीकल्स, व्होडाफोन आयडिया आणि प्रिझम जॉन्सन या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली.
  7. दिवसाच्या सुरूवातीला सेन्सेक्स 40,311 अंशांवर तर निफ्टी 11,911 अंशांच्या पातळीवर होता.
  8. डॉलरच्या तुलनेत रुपया 70.69 रुपये प्रति डॉलर या पातळीवर होता.
  9. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती किंचित कमी होऊन 62.46 डॉलर प्रति बॅरलवर होत्या.
  10. जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. जर्मन शेअर बाजार 0.2 टक्क्यांनी, फ्रेंच शेअर बाजार 0.2 टक्क्यांनी, टोकियो शेअर बाजार 0.2 टक्क्यांनी तर सेऊल शेअर बाजार 0.1 टक्क्यांनी वधारला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex creates new record nifty top 10 happening