esakal | शेअर बाजारात तेजी ; सर्वच क्षेत्रनिहाय निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजला मंत्रिमंडळाने दिलेली मान्यता आणि उद्योग आणि कंपन्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल या अर्थमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 622 अंशांनी वधारून 30,819 वर बंद झाला. तर 187 अंशांच्या वाढीसह निफ्टी 9,066.55 वर स्थिरावला.

शेअर बाजारात तेजी ; सर्वच क्षेत्रनिहाय निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद

sakal_logo
By
पीटीआय

सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजला मंत्रिमंडळाने दिलेली मान्यता आणि उद्योग आणि कंपन्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल या अर्थमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 622 अंशांनी वधारून 30,819 वर बंद झाला. तर 187 अंशांच्या वाढीसह निफ्टी 9,066.55 वर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नजीकच्या काळात भारतीय औद्योगिक क्षेत्राला मदत करण्यासाठी सरकारकडून आणखी काही प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेजेस जाहीर होतील या आशेने बुधवारी भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. तसेच जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये लॉकडाउन शिथिल होत असल्याने जागतिक शेअर बाजार देखील संमिश्र स्वरूपात व्यवहार करत आहेत.

लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये भारतातील कार्बन उत्सर्जनात २६ टक्क्यांची घट

बुधवारच्या सत्रात आलेल्या तेजीने बीएसई आणि एनएसईवरील स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅपसहित बहुतेक सर्वच निर्देशांक सकारात्मक व्यवहार करून बंद झाले. क्षेत्रनिहाय पातळीवर राष्ट्रीय शेअर बाजारात फार्मा, फिनान्शियल सर्व्हिसेस, मीडिया आणि बँकिंग निर्देशांक सर्वाधिक वधारले होते.

भारतातून 16 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक काढून घेतली

सेन्सेक्सच्या मंचावर महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, एल अँड टी , टाटा स्टील, बजाज फायनान्सचे शेअर मोठ्या प्रमाणात तेजी करून बंद झाले. तर, इंडसइंड बँक, हिरोमोटोकॉर्प, एअरटेल आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले होते.

रुपया घसरला
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 15 पैशांनी घसरून 75.80 वर बंद झाला.