esakal | सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा तेजीकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी तेजीचे वातावरण होते. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस   780 अंशांनी वधारला होता. मात्र दुपारच्या सत्रात भारत आणि चीनमध्ये लष्करी तणाव निर्माण झाल्याचे वृत्त येताच बाजारात विक्रीचा मारा सुरु झाला आणि सेन्सेक्समध्ये 250 अंशांची  घसरण झाली.

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा तेजीकडे

sakal_logo
By
पीटीआय

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी तेजीचे वातावरण होते. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस   780 अंशांनी वधारला होता. मात्र दुपारच्या सत्रात भारत आणि चीनमध्ये लष्करी तणाव निर्माण झाल्याचे वृत्त येताच बाजारात विक्रीचा मारा सुरु झाला आणि सेन्सेक्समध्ये 250 अंशांची  घसरण झाली. मात्र पुन्हा तो वधारला. दिवसअखेर सेन्सेक्स 376 अंशाच्या वाढीसह 33 हजार 605 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 100 अंशांनी वधारला.तो 9 हजार 914 अंशांवर स्थिरावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेअर बाजारात खरेदीचा जोर असल्याने सर्वच क्षेत्र सकारात्मक पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये अनुक्रमे 1.35 टक्के आणि 1.42 टक्क्यांची वाढ झाली. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान  क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने सोमवारी जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रोखे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

'जिओ'मध्ये होणार आणखी एक गुंतवणूक, सौदी अरेबियन कंपनीकडून होण्याची शक्यता

मुंबई शेअर बाजारातील आघाडीच्या 30 कंपन्यांपैकी 14 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. सेन्सेक्सच्या मंचावर एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक , इन्फोसिस, कोटक बँक, बजाज फायनान्स, टीसीएस, मारुती, हिरो मोटो कॉर्प, एशियन पेंट या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले होते. तर रिलायन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो, ओएनसीजी, सन फार्मा,  एअरटेल, एल अँड टीच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

मे महिन्यात भारताच्या निर्यातीत घट

रुपया वधारला -
चलन बाजारात मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 14 पैशांची वधारला. तो डॉलरच्या तुलनेत 75.89 रुपये प्रतिडॉलरवर स्थिरावला.