esakal | मे महिन्यात भारताच्या निर्यातीत घट
sakal

बोलून बातमी शोधा

Ship

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर भारताच्या भौगोलिक व्यापारी सीमा मोठ्या प्रमाणावर बंद असल्याने मे महिन्यात आयात-निर्यातीमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. भारताची निर्यात तब्बल 36.47 टक्क्यांनी घटून 19.05 अब्ज डॉलरवर आली आहे. तर आयातीत देखील 51 टक्क्यांची घट झाली आहे. आयात 22.2 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे.

मे महिन्यात भारताच्या निर्यातीत घट

sakal_logo
By
पीटीआय

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर भारताच्या भौगोलिक व्यापारी सीमा मोठ्या प्रमाणावर बंद असल्याने मे महिन्यात आयात-निर्यातीमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. भारताची निर्यात तब्बल 36.47 टक्क्यांनी घटून 19.05 अब्ज डॉलरवर आली आहे. तर आयातीत देखील 51 टक्क्यांची घट झाली आहे. आयात 22.2 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कपडे (टेक्स्टाईल), इंजिनिअरिंग आणि ज्वेलरी क्षेत्रातील निर्यात घटल्याने एकूण निर्यातीत घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात निर्यातीत घसरण झाली.

निर्यातीत घट होऊनदेखील व्यापार तूट 31.5 अब्ज डॉलरवर पोचली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात ती 15.36 अब्ज डॉलर होती. 

घसरणीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल; सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ

मे महिन्यात झालेली घट एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी आहे. एप्रिल महिन्यात 60.28 टक्क्यांची घसरण झाली होती. 

 प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या आयातीत 71.98 टक्क्यांची घसरण होत ती 3.49 अब्ज डॉलरवर आली आहे. जी गेल्यावर्षी याच काळात 12.44 अब्ज डॉलर होती. सोन्याच्या आयातीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. मे महिन्यात सोने आयात 98.4 टक्क्यांनी घटत 7.631 कोटी डॉलर आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

व्यापार प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष मोहित सिंगला म्हणाले की, कोरोनामुळे प्रभावित झालेल्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात एप्रिल-मे महिन्यात निर्यातीत 47.54 टक्क्यांनी घट झाली. ती 29.41 अब्ज डॉलरवर पोचली. तर आयात 5.67 टक्क्यांनी घसरत 39.42 अब्ज डॉलरवर पोचली आहे.

लॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता तुमच्या पीएफ खात्यातील पैसे ! कसे ते घ्या जाणून...
 
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरील मागणी घटल्याने, ऑर्डर रद्द झाल्याने आणि पुरवठा साखळी खंडित झाल्याने निर्यात घटली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. एप्रिल महिन्यात प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या आयातीत 15 टक्क्यांची म्हणजेच 10 अब्ज डॉलरची घट झाल्याने वित्तीय तूट कमी झाली होती.