esakal | Share Market: भांडवली बाजार तेजीत; सेन्सेक्स विक्रमी 40 हजारांच्या पार
sakal

बोलून बातमी शोधा

nifty- sensex

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याच्या सकारात्मक बातम्यांमुळे वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात बुधवारी तेजीचे चित्र दिसून आले होते.

Share Market: भांडवली बाजार तेजीत; सेन्सेक्स विक्रमी 40 हजारांच्या पार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशातील भांडवली बाजारात तेजीचे वारे सुरु असून आजच्या सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स (Sensex) 522.76 अंशानी वाढून 40,401.71 वर गेला आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 1.31 टक्क्यांची वाढ दिसली आहे.  मागील सत्रातही सेन्सेक्स जवळपास 305 अंशानी वाढला होता. सध्या रिलायन्समध्ये जागतिक गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करताना दिसत आहेत. बुधवारी अबुधाबीतील ADIA च्या उपकंपनीने रिलायन्समध्ये जवळपास 5 हजार कोटींची गुंतवणूक केली होती.

सत्राच्या सुरुवातीला निफ्टीतही (NIFTY 50) चांगली वाढ दिसून आली आहे. निफ्टीत आतापर्यंत 146.45 अंशांनी वाढ होऊन 11,885 पर्यंत गेला आहे. ही वाढ 1.25 टक्के आहे.

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याच्या सकारात्मक बातम्यांमुळे वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात बुधवारी तेजीचे चित्र दिसून आले होते. अमेरिकेत सरकारच्या प्रोत्साहन पॅकेजच्या आशावादाने भांडवली बाजारातील सकारात्मक भावनांना आणखीन चांगली चालना मिळत आहे.  

आरोग्य विमा घेण्यापूर्वी घ्या काळजी;  IRDAIने दिली महत्वाची माहिती

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे होऊन व्हाईट हाऊसला परतल्यापासून जागतिक भांडवल बाजारावर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. रिजर्व बॅंकेची पतधोरणाची द्विमासिक बैठक लांबणीवर गेली होती जी बुधवारपासून सुरु झाली. एमपीसीवर सरकारकडून सोमवारी रात्री तीन सदस्यांना नियुक्त केले आहे. त्यामध्ये जयंत वर्मा, अशिमा गोयल आणि शशांक भिडेंचा सामावेश आहे. या बैठकीत आर्थिक मंदीतून जात असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी धोरणात्मक बदलांचा सल्ला दिला जाऊ शकतो. 

(edited by- pramod sarwale)