Share Market : 'या' शेअरने केवळ दोन वर्षात केले मालामाल! येत्या काळात आणखी तेजीचा तज्ज्ञांचा विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 'या' शेअरने केवळ दोन वर्षात केले मालामाल! येत्या काळात आणखी तेजीचा तज्ज्ञांचा विश्वास

Share Market : केपीआर मिल्स लिमिटेड (KPR Mills Limited) ही एक टेक्सटाईल कंपनी आहे जी जगभरातील 60 देशांमध्ये निर्यात करते.

कंपनीच्या टेक्सटाईल पोर्टफोलिओमध्ये यार्न, फॅब्रिक आणि गारमेंट्सचा समावेश आहे. कंपनीचा व्यवसाय यार्न, फॅब्रिक, गारमेंट्स आणि व्हाईट क्रिस्टल साखरेपर्यंत विस्तारलेला आहे.

कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात ऑटोमेटेड आहे. कंपनी अत्याधुनिक टेक्नोलीजी इक्विपमेंट्स आणि टूल्स वापरते. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 180 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

15 जानेवारी 2021 रोजी हा शेअर 186.04 रुपयांवर होता आणि आता तो 521.65 रुपयांवर पोहोचला. या शेअरने गेल्या दोन वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे, तर एसअँडपी बीएसई 500 इंडेक्सने या कालावधीत सुमारे 29% परतावा दिला आहे.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

कंसोलिडेटेड बेसिसवर कंपनीचा नेट रेव्हेन्यू या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक 1.82 टक्क्यांनी वाढून 1,173 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचा नफा 16 टक्क्यांनी घटून 203 कोटी रुपयांवर आला आहे.

कंपनीचा शेअर सध्या टीटीएम पीईच्या 20.70 पटीने व्यापार करत आहे तर इंडस्ट्रीचा पीई 29.70 पट आहे. कंपनीचा आरओई 30% आणि आरओसीई 31% आहे. ही कंपनी ग्रुप ए स्टॉक्सचा एक भाग आहे आणि तिचे मार्केट कॅप 17,801.67 कोटी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.