Padma Shree : बिग बुल झुनझुनवाला यांना मरणोत्तर पद्मश्री; असे बनले शेअर मार्केटचे बादशहा

सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत स्वर्गीय राकेश झुनझुनवाला यांच्या नावाचाही समावेश आहे.
Rakesh Jhunjhunwala
Rakesh JhunjhunwalaSakal

Padma Shree Rakesh Jhunjhunwala : सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत स्वर्गीय राकेश झुनझुनवाला यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट रोजी निधन झाले. शेअर बाजारातील बिग बुल म्हणून त्यांची ओळख होती.

5 जुलै 1960 रोजी जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाने कधीही कल्पना केली नव्हती की, त्यांचा मुलगा अब्जाधीश होईल. राकेश यांचे वडील राधेश्याम झुनझुनवाला आयकर विभागात अधिकारी होते.

अनेकदा शेअर बाजारात पैसे गुंतवत असे. त्यांना पाहून राकेश यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा मोह झाला. त्यांनी राकेश झुनझुनवालाला यांना स्पष्टपणे सांगितले की, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आधी स्वत: कमवायाला शिका. मित्राकडून कर्ज घेण्यासही त्यांनी नकार दिला.

Rakesh Jhunjhunwala
RBI E-Rupee : आनंद महिंद्रा यांनी आरबीआयच्या ई-रुपीद्वारे केले पहिले पेमेंट; व्हिडिओ होतोय व्हायरल

झुनझुनवाला यांना गुंतवणुकीसाठी पैसे कसे मिळाले?

आता प्रश्न असा पडतो की राकेश झुनझुनवाला यांच्या वडिलांनी पैसे देण्यास आणि कोणाकडून कर्ज घेण्यास नकार दिला असताना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पैसे कोठून आणले?

अशा स्थितीत राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या भावाच्या एका ग्राहकाशी संपर्क साधला आणि मोठा नफा मिळवून देण्याचे सांगून पाच हजार रुपयांचे कर्ज मागितले. तेच पाच हजार रुपये त्यांनी 1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवले आणि यशाची शिखरे चढायला सुरुवात केली.

तुमचा विश्वास बसणार नाही की, 1985 मध्ये पाच हजार रुपये गुंतवण्यापूर्वीच राकेश झुनझुनवाला त्यांना यश मिळाले होते. हळूहळू ही रक्कम वाढून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त झाली, त्यामुळे त्यांनी टाटा टीचे कंपनीचे पाच हजार शेअर्स 43 रुपये प्रति शेअर या भावाने खरेदी केले.

हेही वाचा : Sarfaraz Khan : धावांचा डोंगर, पण टीम इंडियातील स्थान फिटनेस अभावी गमावलं?

अवघ्या तीन महिन्यांत हे शेअर्स खूप वेगाने चढले. झुनझुनवाला यांनी टाटा टीचे सर्व शेअर्स 143 रुपये प्रति शेअर या दराने विकले आणि अवघ्या तीन महिन्यांत ही रक्कम तिप्पट झाली. काही वर्षातच टाटांनी झुनझुनवाला यांना अब्जाधीश केले.

झुनझुनवाला शेअर बाजाराचा बिग बुल कसे बनले?

खरे तर राकेश झुनझुनवाला यांनी निवडक शेअर्समध्ये पैसे गुंतवले आणि अवघ्या तीन वर्षांत करोडपतींच्या यादीत सामील झाले, पण टाटा समूहाने त्यांचे नशीब पुन्हा उजळले.

2003 मध्ये त्यांनी टाटा ग्रुपच्या टायटनमध्ये पैसे गुंतवले. त्यांनी टायटनचे सहा कोटी शेअर्स 3 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेतले. जे काही काळानंतर 7,000 कोटी रुपयांचे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com