Share Market : नवीन वर्षात 'हे' 5 शेअर्स करतील तुम्हाला मालामाल; तुमच्याकडे आहेत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : नवीन वर्षात 'हे' 5 शेअर्स करतील तुम्हाला मालामाल; तुमच्याकडे आहेत का?

जागतिक बाजारातील परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारात चढ-उतार दिसून येत आहेत. शुक्रवारी देशांतर्गत बाजारात मोठी घसरण दिसून आली. शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी झाल्या आहेत.

ब्रोकरेज हाऊसेसने काही दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन वर्षात या शेअर्समध्ये सध्याच्या किमतीवरून 33 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळू शकतो.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी जेके सिमेंटच्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात प्रति शेअरची लक्ष किंमत 3550 रुपये आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 2,930 रुपये होती. या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 620 रुपये किंवा 21 टक्के परतावा मिळू शकतो.

ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने PB Fintech च्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात प्रति शेअर लक्ष्य किंमत 550 रुपये आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 439 रुपये होती. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 111 रुपये किंवा सुमारे 25 टक्के परतावा मिळू शकतो.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थनेVenus Pipes च्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात प्रति शेअर लक्ष्य किंमत 905 रुपये आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत रु.720 होती. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 185 रुपये किंवा सुमारे 26 टक्के परतावा मिळू शकतो.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने Dixon Technologies च्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात प्रति शेअर लक्ष्य किंमत 4960 रुपये आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 3,729 रुपये होती. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1231 रुपये किंवा सुमारे 33 टक्के परतावा मिळू शकतो.

हेही वाचा: Work From Home : पुन्हा वर्क फ्रॉम होम! वाढत्या कोरोनामुळे कंपन्यानी सुरू केला पुनर्विचार

ब्रोकरेज फर्म शेअरखानने Bharti Airtel च्या शेअरवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 1010 आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 809 रुपये होती. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 201 रुपये किंवा सुमारे 25 टक्के परतावा मिळू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.