केवळ 3.7 रुपयांचा शेअर 20 वर्षात पोहोचला 2424 रुपयांवर...

Share Market: गेल्या 20 वर्षात, SRF च्या शेअरची किंमत 3.71रुपयांवरून आता 2424.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.
SRF Multibagger Stocks
SRF Multibagger StocksSakal

Multibagger Stocks: पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते पण अनेक जोखीम घेणारे गुंतवणूकदार अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात कारण हेच शेअर्स लाँग टर्म मध्ये मोठा परतावा देतात शेअर बाजारातील (Share Market) तज्ज्ञांच्या मते शेअर्समध्ये गुंतवणूक करणे म्हणजे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखे आहे. आजकाल, मोठ्या संख्येने गुंतवणूकदार स्टार्टअपमध्ये गुंतवणूक (Investment) करत आहेत, कारण सध्या या शेअर्सची किंमत अगदी स्वस्त आहे. पण कंपनीच्या व्यवसाय मॉडेलबद्दल आणि नफ्याबद्दल आत्मविश्वास असल्यासच, हे जोखीम घेणारे गुंतवणूकदार त्यात पैसे टाकतात.

SRF Multibagger Stocks
Multibagger stock : यंदा 'या' एज्युकेशनल स्टॉकने आतापर्यंत दिला 270 टक्के परतावा

याचेच सगळ्या महत्त्वाचे उदाहरण SRF चे शेअर्सचे आहे. हा शेअर 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. या केमिकल स्टॉकचा उत्तम परतावा देण्याचा इतिहास आहे. गेल्या 20 वर्षात, SRF च्या शेअरची किंमत 3.71रुपयांवरून (NSE वर 22 फेब्रुवारी 2002 ची किंमत) आता 2424.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत त्यात सुमारे 65,250 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या एका महिन्यात, SRF च्या शेअरची किंमत 2349 रुपयांवरून 2424 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत त्यात सुमारे 3.5 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत, SRF च्या शेअरची किंमत 1812 रुपयांवरून 2424 रुपयांपर्यंत 35 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 1090 रुपयांवरून 2424 रुपयांपर्यंत 125 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 5 वर्षांत, या मल्टीबॅगर केमिकल्सच्या स्टॉकची किंमत 315 वरून 2424 पर्यंत 675 टक्क्यांनी वाढली आहे.

SRF Multibagger Stocks
Stock Limit नंतरही Soybean Market स्थिर | India Soybean Market; पाहा व्हिडिओ

20 वर्षात 1 लाखाचे 6.5 कोटी-

एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज 44.50 लाख रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 6.53 कोटी झाले असते.

शेअर बाजारातील तज्ज्ञ अजूनही या शेअरबाबत बुलिश आहेत. नुकतेच रिट्रेसमेंटनंतर मल्टीबॅगर केमिकल्सच्या स्टॉकमध्ये मोठी तेजी येऊ शकेल असा त्यांचा विश्वास आहे. पुढील एका महिन्यात हा स्टॉक 2600 रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com