Share Market Closing : RBI च्या निर्णयानंतर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; अदानींच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

सलग 2 घसरत असलेल्या शेअर बाजाराला आज ब्रेक लागला.
Share Market
Share MarketSakal

Share Market Closing : सलग 2 घसरत असलेल्या शेअर बाजाराला आज ब्रेक लागला. सेन्सेक्स 370 अंकांनी वाढून 60600 वर तर निफ्टी 140 अंकांच्या वाढीसह 17850 वर बंद झाला.

आयटी, हेल्थकेअर आणि मेटल समभाग बाजारामध्ये सर्वाधिक तेजीत आहेत. आज बाजारात 3031 समभागांची विक्री झाली, ज्यामध्ये 2000 समभागांमध्ये मजबूती दिसून आली.

रिझव्‍‌र्ह बँकेने आज सलग सहाव्यांदा व्याजदरात वाढ केली, ज्यात 25 आधार अंकांची वाढ होऊन 6.5 % झाली आहे.

आरबीआयच्या या निर्णयानंतर बाजाराचा वेग आणखी वाढला आणि शेवटी तेजीत बाजार बंद झाला. या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध एकूण कंपन्यांचे मार्केट कॅप 268.68 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

BSE
BSE India

आज बाजारामध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तेजी दिसून आली. अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये आज दुसऱ्या दिवशी चांगली वाढ झाली. त्याच वेळी, रेपो दरात वाढ झाल्यामुळे बँकिंग स्टॉकमध्ये घसरण झाली.

Share Market
RBI News : RBI ची नवी टेक्नॉलॉजी, आता एटीएममधून बाहेर येणार नाणी; 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा

'या' शेअर्समध्ये तेजी :

आज बाजारात अदानी, बजाज ऑटो, रिलायंस इंड, इंफोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नो, टीसीएस, बजाज फिनसर्व, टाटा मोटर्स, टेक महिन्द्रा, मारुती सुजुकी या शेअर्स मध्ये तेजी दिसून आली.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

'या' शेअर्समध्ये घसरण :

आज बाजारात कोटक महिन्द्रा बैंक, हिंदुस्तान यूनीलीवर, एक्सिस बैंक, भारती एयरेटल, एल एंड टी, पॉवर ग्रिड कॉर्प या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com