Share Market Closing : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; अदानींच्या 'या' शेअर्समध्ये मात्र घसरण सुरूच

बाजार सकाळी घसरणीने उघडला असला तरी बाजारात विक्री दिसून आली.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत बंद झाला. बाजार सकाळी घसरणीने उघडला असला तरी बाजारात विक्री दिसून आली. मात्र आयटी बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे बाजाराला वेग आला.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 142 अंकांच्या वाढीसह 60,806 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह 17,893 अंकांवर बंद झाला.

BSE India
BSE IndiaSakal

आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, बँकिंग, मीडिया क्षेत्रातील समभागांशी संबंधित निर्देशांकांनी तेजी घेतली तर ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, धातू, ऊर्जा, इन्फ्रा, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तूंशी संबंधित निर्देशांक घसरले.

Share Market
Bill Gates Girlfriend : 67 वर्षांचे बिल गेट्स प्रेमात? जाणून घ्या कोण आहे त्यांची गर्लफ्रेंड

मिडकॅप निर्देशांक तेजीसह बंद झाला आहे, स्मॉलकॅप निर्देशांक घसरले आहेत. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 26 समभाग वाढीसह बंद झाले तर 24 समभाग तोट्यासह बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 समभाग वाढीसह बंद झाले तर 12 समभाग तोट्यासह बंद झाले.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ :

शेअर बाजार तेजीसह बंद झाला, पण गुरुवारच्या सत्रात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. BSE वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप बुधवारी 268.62 लाख कोटी रुपयांवरून 268.45 लाख कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 17,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.