शेअर बाजार कोसळला, Sensex एक हजार अंकानी घसरला

गेल्या कित्येक दिवसापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे.
share market
share marketsakal

गेल्या कित्येक दिवसापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे. शेअर बाजारातील अस्थिरता सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकातून दिसून येत आहे. आज सुरवातीच्या सत्रातील घसरण शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती. अखेर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 1000 अंकानी घसरुन 54,300 वर बंद झाला तर निफ्टीतही 276 अंकाची घसरण होत 16.201वर बंद झाला.

आज शेअर बाजार सुरवातीच्या सत्रातही मोठ्या घसरणीसह सुरु झाला. सेन्सेक्स 560.03 अंकांनी घसरून 54,760.25 वर सुरु झाला, तर निफ्टी 194.15 अंकांनी घसरून 16,283.95 वर सुरु झाला.

share market
तुमच्याकडं जुन्या काळातील 10 पैशांची 'ही' तीन नाणी असतील, तर कमवू शकता 9 लाख रुपये

आपण सध्या मंदीच्या स्थितीत असल्याचे कॅटॅलिस्ट वेल्थचे प्रशांत सावंत म्हणाले. निफ्टीही 16600 च्या पातळीवर पोहोचलेला नाही. 16500 च्या पातळीवर मोठा रझिस्टंस दिसून येत आहे. म्हणूनच सध्या ते नो ट्रेड झोनमध्ये असल्याचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

जोपर्यंत निफ्टी 16200 च्या खाली जात नाही, तोपर्यंत त्यात एक पुलआउट दिसू शकतो. 16500 ते 16600 मधील पातळी दिसल्यास, तुम्ही नफा बुक (Profit Booking) केला पाहिजे. जोपर्यंत तो या पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ट्रेड करु नका असा सल्ला त्यांनी दिला.

share market
ऑईल इंडियाच्या शेअर्सचा मल्टीबॅगर परतावा, पण आता गुंतवणूकदारांनी काय करावे?

काल विकली एक्स्पायरीच्या दिवशी अर्थात गुरुवारी भारतीय शेअर बाजार मजबूत वाढीसह बंद झाला. गुरुवारी, सेन्सेक्स आणि निफ्टी (Nifty) चांगल्या रिकव्हरीसह हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स 427.79 अंकांनी म्हणजेच 0.78 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 55,320.28 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय निफ्टी 50 निर्देशांक 121 अंकांनी म्हणजेच 0.74 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 16400 च्या वर बंद झाला. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात 1750 शेअर्सची खरेदी झाली तर 1550 शेअर्सची विक्री झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com