गुंतवणूकदारांना मोठा फटका, सलग दोन दिवस शेअर बाजारात घसरण

अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.
Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market News sakal

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी होती मात्र दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोलमडला. आज पहिल्याच सत्रात शेअर बाजार घसरणीसह उघडला. दिवसभरात शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स 215 अंकानी 52,960 वर बंद झाला तर निफ्टी 51 अंकानी 15,800 वर बंद झाला. (share market closing update 29 june 2022)

आज शेअर बाजारातील तब्बल 32 कंपनीचे शेअर्स घसरले तर 18 कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने WIPRO, KOTAKBANK, TITAN,BAJAJFINSV, HDFCLIFE, SBIN सह 32 कंपन्याचे शेअर्स खाली आले आहेत. (Share Market Latest Updates)

Share Market Latest Updates | Stock Market News
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकानी घसरुन 52,675 वर उघडला तर निफ्टी 154 अंकानी घसरुन 15,695 वर उघडला. सलग आज दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली.

मंगळवारी सेन्सेक्स, निफ्टी फ्लॅट बंद झाले. सेन्सेक्स 16 अंकांनी 53077 वर तर निफ्टी 18 अंकांनी वर चढून 15850 वर बंद झाला. मेटल, ऑटो, एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. त्याचवेळी बँकिंग, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव होता.

Share Market Latest Updates | Stock Market News
गुंतवणूकदारांना मोठा फटका, सलग दोन दिवस शेअर बाजारात घसरण

युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारतीय चलनाची आताची स्थिती पाहता FII भारतात नफा कमावताना दिसत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. पण यापैकी कोणत्याही बाबतीत काही बदल झाले तर परिस्थिती आणखी बदललेली दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com