Share Market: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली
Share Market News
Share Market NewsSakal

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. आज सेन्सेक्स 93.91 अंकानी घसरुन 55.675 वर बंद झाला तर निफ्टीतही 14.75 अंकाची घसरण होत 16.570 वर बंद झाला.

प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होती. शेअर मार्केटमध्ये सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स १५८ अंकांनी घसरुन ५५,६१० वर उघडला तर निफ्टी ५३.६० अंकांनी घसरुन १६,५३० वर उघडला त्यामुळे आज शेअर बाजारात विक्रीचा जोर पाहायला मिळाला.

Share Market News
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर, Sensex अन् Nifty घसरली

शुक्रवारी दमदार सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक दिवसअखेर लाल चिन्हात बंद झाला होता. सेन्सेक्स 48.88 अंकांनी अर्थात 0.09 टक्क्यांनी घसरून 55769.23वर बंद झाला, तर निफ्टी 43.70 अंकांनी अर्थात 0.26 टक्क्यांनी घसरून 16628 वर बंद झाला होता.

Share Market News
Gold-Silver Price: सोने महागलं तर चांदी स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

महागाई वाढण्याची आणि व्याजदरात वाढ होण्याची भीती याचा बाजारावर दबाव असल्याचे झाल्याचे कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणाले. या आठवड्यात सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवलेत, ज्याचा परिणाम बाजारावर होत असल्याचेही ते म्हणाले.

बाजारात सध्या वाढती महागाई, व्याजदरातील वाढीमुळे बाजारात चिंतेचे वातावरण असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. अशा परिस्थितीत बाजारातील कोणत्याही तेजीवर नफा बुकिंग (Profit Booking) करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Share Market News
LICच्या बाजार भांडवलात घसरण सुरुच, गुंतवणुकदारांना 94 हजार कोटींचा फटका

एलआयसीचे बाजार भांडवल घसरले

मागील 14 ट्रेडिंग सत्रात एलआयसीचे बाजार भांडवल कमी झाले असून एलआयसी गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी गमावले आहे. आयपीओनुसार अप्पर बँण्डच्या हिशोबाने एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 6 लाख 242 कोटी रुपये होते मात्र आता एलआयसीचे बाजार भांडवल 5 लाख सहा हजार 126 कोटी रुपयांवर आले. म्हणजेच एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com