Share Market : शेअर बाजारात नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी अर्थात वर्षाच्या शेवटच्या दिवसाअंती वाढ झाली.

शेअर बाजारात नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल?

भारतीय शेअर बाजारात (Share Market) शुक्रवारी अर्थात वर्षाच्या शेवटच्या दिवसाअंती वाढ झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 459 अंकांनी (0.08टक्के) वाढून 58,253.82 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)चा निफ्टी (Nifty)150.10 अंकांनी म्हणजेच 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 17,354.05 वर बंद झाला.

हेही वाचा: Share Market : 50 रुपयांपेक्षा स्वस्त शेअर! देणार उत्तम परतावा

Share Market updates

Share Market updates

यावर्षी भारतीय शेअर बाजारासमोर अनेक आव्हाने आहेत. यामध्ये अमेरिकेतील वाढणारे व्याजदर, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, सर्व राज्यांतील निवडणुका, कोरोनाची (Corona) संभाव्य तिसरी लाट, देशांतर्गत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता, महागडे मूल्यांकन यासारख्या आव्हानांचा समावेश असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ धीरज रेल्ली म्हणाले.

या सगळ्या आव्हानांव्यतिरिक्त सेन्सेक्स आणि निफ्टीने 2021 मध्ये अनुक्रमे 22 टक्के आणि 24 टक्के परतावा दिला आहे आणि गेल्या 4 वर्षातील दोघांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. व्हॅल्यूएशनची चिंता असूनही, निफ्टी-50 निर्देशांकाने आशियातील सर्व अर्थव्यवस्थांना मागे टाकले आणि एमएससीआय जागतिक निर्देशांकाला मागे टाकले आहे, ज्याने यावर्षी केवळ 17 टक्के परतावा दिला आहे.

हेही वाचा: वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी

share market

share market

2021 हे वर्ष भारतीय बाजारपेठेसाठी पुनर्प्राप्तीचे आणि पुढील वाढीसाठी पाया घालण्याचे वर्ष आहे असे शेअर बाजार तज्ज्ञ नवीन कुलकर्णी म्हणाले. 2022 मध्ये आपल्याला थोडी अधिक अस्थिरता दिसू शकते, परंतु असे असूनही, 2022 हे गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले वर्ष असेल असेही ते म्हणाले. 2022 मध्ये पुन्हा एकदा डबल डिजिट रिटर्न मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑटो, बँका आणि भांडवली कॅपिटल गुड्समध्ये 2022 ला चांगली वाढ होईल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स ?

- हिंदाल्को (HINDALCO)

- टायटन (TITAN)

- अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

- टाटा मोटर्स (TATA MOTORS)

- कोटक बँक (KOTAKBANK)

- आयडिया (IDEA)

- भारत हेवी इलेक्ट्रिकल (BHEL)

- ट्रेंट (TRENT)

- बाटा इंडिया (BATA INDIA)

- पेज इंडिया (PAGEIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top