esakal | शेअर बाजारात तेजी कायम
sakal

बोलून बातमी शोधा

sensex up

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 290 अंशांनी वधारून 34 हजार 247 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 69 अंशांनी वधारला. तो 10 हजार 116 अंशांवर स्थिरावला. एका बाजूला जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार सुरळीत होत असताना दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात वाढती चिंता गुंतवणूकदारांना सतावते आहे. शेअर बाजारात सध्या संमिश्र वातावरण असून सकाळच्या सत्रात आलेली तेजी दुपारच्या सत्रात नफावसुलीमुळे ओसरली.

शेअर बाजारात तेजी कायम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जागतिक पातळीवरून मिळणारे सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत बाजारात बँकांचे शेअर वधारल्याने बुधवारी शेअर बाजारात तेजी होती. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 290 अंशांनी वधारून 34 हजार 247 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 69 अंशांनी वधारला. तो 10 हजार 116 अंशांवर स्थिरावला.

क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स

एका बाजूला जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार सुरळीत होत असताना दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात वाढती चिंता गुंतवणूकदारांना सतावते आहे. शेअर बाजारात सध्या संमिश्र वातावरण असून सकाळच्या सत्रात आलेली तेजी दुपारच्या सत्रात नफावसुलीमुळे ओसरली.

फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी अमेरिकी बाजारात मोठी विक्री झाली. डाऊ जोन्स 362 अंशांनी घसरला होता. तर नॅसडॅक निर्देशांकात 32 अंशांची घसरण झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

क्षेत्रीय पातळीवर रिअल इस्टेट, एनर्जी आणि बँकांचे शेअर सर्वाधिक वधारले होते. 

सेन्सेक्सच्या मंचावर भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, कोटक बँक आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर इंडसइंड बँक, सन फार्मा, महिंद्र अॅण्ड महिंद्र व एचडीएफसीचे शेअर वधारून बंद झाले.

रुपयात घसरण:

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात 10 पैशांनी घसरण झाली. तो 75.57 रुपये प्रतिडॉलर पातळीवर स्थिरावला.

'टर्म इन्श्युरन्स', आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा खांब