Share Market : गुंतवणूकदार मालामाल! 3 वर्षात एका लाखाचे झाले 13 लाख, 'या' केमिकल स्टॉकची दमदार कमाई...

गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये जवळपास 27 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Share Market
Share Market Sakal

Share Market : शेअर बाजारात गेले काही दिवसांपासून अस्थिरता दिसून येत आहे. मात्र, या घसरणीनंतरही काही शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. असाच एक शेअर म्हणजे फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर (Fertilisers & Chemicals Travancore) आहे.

गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये जवळपास 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुरुवारी हा शेअर 5 टक्के वाढला आहे आणि आता तो 336.50 रुपयांवर पोहोचला आहे.

5 वर्षात 480% परतावा :

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्म तसंच लॉन्ग टर्ममध्ये चांगला परतावा दिला आहे. केवळ गेल्या 6 महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 230% परतावा दिला आहे.

Share Market
Auto Stock : गुजरातमधील ही ऑटो कंपनी चर्चेत, 6 महिन्यात चक्क 109% रिटर्न

तर गेल्या वर्षभरात त्यात 121 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 480% परतावा दिला आहे.

3 वर्षात एका लाखाचे 13 लाख :

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोरच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1200% परतावा दिला आहे. मार्च 2020 मध्ये, त्याच्या एका शेअरची किंमत 26.90 रुपये होती. तर सध्या त्याची किंमत 336.50 रुपये झाली आहे.

म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 13 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमचे एक लाख 13 लाख रुपये झाले असते.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com