Share Market Closing : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेयर बाजारत घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market news updates

Share Market Closing : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेयर बाजारत घसरण

Share Market Closing : या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला आहे. आजच्या दिवसाच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 461 अंकांनी घसरून 61,337 वर बंद झाला आणि निफ्टी 146 अंकांनी घसरून 18,269 अंकांवर बंद झाला.

BSE India

BSE India

बाजारातील सर्वच क्षेत्रात घसरण झाली आहे. बँकिंग, आयटी, एफएमसीजी, फार्मा, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट, इन्फ्रा या सर्व क्षेत्रांत घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागातही घसरण झाली आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

BSE India

BSE India

आज सेन्सेक्स 2.39 टक्क्यांनी घसरला आहे. आजच्या घसरणीत PSU बँक, हेल्थकेअर आणि आयटी, ऑटो निर्देशांकाचा सर्वाधिक वाटा आहे. बँक निफ्टीने 278 अंकांची घसरण नोंदवली आणि तो 43,219 स्तरावर बंद झाला.

हेही वाचा: इन्फोसिसची धुरा देताना केली मोठी चूक; असं का म्हणाले नारायण मूर्ती?

तेजीसह बंद झालेल्या समभागांमध्ये टाटा मोटर्स 1.18 टक्के, एचडीएफसी बँक 0.48 टक्के, एचयूएल 0.30 टक्के, टाटा स्टील 0.09 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.01 टक्के यांचा समावेश आहे. डॉ रेड्डीज लॅब 3.58 टक्क्यांनी, महिंद्रा अँड महिंद्रा 2.75 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स 2.66 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 2.39 टक्क्यांनी, बीपीसीएल 2.12 टक्क्यांनी, एसबीआय 2.05 टक्क्यांनी घसरले.