esakal | Sensex चा उच्चांक; कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा सकारात्मक परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

share market

तेजीनं होणारं लसीकरण आणि दुसऱ्या लाटेमुळे तुलनात्मरित्या कमी झालेलं नुकसान, या बातमीमुळे शेअर बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळाला.

Sensex चा उच्चांक; कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा सकारात्मक परिणाम

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबई - आज बाजारात सेन्सेक्सने उच्चांकी उसळी घेतली. सेन्सेक्स 52 हजार 626 वर तर निफ्टी 15 हजार 835 वर पोहोचला. जागतिक बाजारातील सकारात्मक उलाढालीचा परिणाम दिसल्याचं म्हटलं जात आहे. आजच्या बाजारात मोठ्या कंपन्यांसह लहान कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. बीएसई स्मॉल आणि मिडकॅप इंडेक्ससुद्धा अनुक्रमे 23045 आणि 25248 वर पोहोचला.

जागतिक बाजारपेठेत चांगली कामगिरी करणाऱ्या बाजारात भारत आघाडीच्या देशांमध्ये राहिला आहे. 2021 मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स 10 टक्के तर निफ्टीमध्ये 13 टक्के वाढ बघायला मिळाली आहे. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजारातील भांडवल हे 231 लाख कोटी रुपयांहून जास्त झाले आहे.

हेही वाचा: 100-200 रुपयांत विकत घ्या टेस्ला, फेसबुक, गुगलसारख्या कंपन्यांचे शेअर्स; कसे ? वाचा...

भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मधल्या काळात दरदिवशी चार हजार मृत्यू आणि तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडत होते. आता एक लाखांच्या आत रुग्णसंख्या आली असून भारताला दिलासा मिळाला आहे. तसंच अनेक राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जात आहेत. यामुळे बाजारात तेजी बघायला मिळत आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे देशातील मागणीत वाढ दिसत असून याचा फायदा होईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.