
शेअर बाजारात अस्थिरता, सेन्सेक्स वधारला तर निफ्टीत घसरण
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. शेअर बाजाराने प्री-ओपनिंगमध्ये नफ्यावर सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 107.98 अंकांच्या वाढीसह तो 54,600 वर सुरु झाला आहे तर निफ्टी २९.५० अंकांनी टक्क्यांनी घसरत 16300 वर सुरु झाला. (share market opening update 10 may 2022)
हेही वाचा: 'प्रधानमंत्री आवास योजने'चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार?
भारतीय बाजारात सोमवारची सुरुवात कमजोर झाली आणि दिवसभर ही कमजोरी अशीच राहली. मोठ्या प्रमाणात विक्री, डॉलरची मजबूती, महागाई वाढण्याची भीती आणि मध्यवर्ती बँकांनी कठोर आर्थिक धोरण स्वीकारण्याची शक्यता यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. शेवटी सेन्सेक्स 364.91 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 54,470.67 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 109.40 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 16,301.85 वर बंद झाला
हेही वाचा: हे 10 शेअर्स देतील दमदार परतावा; जाणून घेऊया शेअर बाजाराचा मूड
आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.
Web Title: Share Market Opening Update 10 May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..