
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात दबाव, गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम
Share Market Update: आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. गुरुवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला मात्र आज शेअर बाजार हलक्या तेजीने सुरू झाला. पहिल्या सत्रात सेन्सेक्स 300 अंकांच्या तेजीसह 53,720 वर सुरू झाला तर निफ्टी 80 अंकाच्या तेजीसह 16,020वर सुरू झाला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.(Share Market news today)
आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने आज बाजारात दबाव दिसून येईल तर गुंतवणूकदारांमध्येही धाकधूक कायम राहील. (share market opening update 15 july 2022)
हेही वाचा: आजपासून राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
गुरुवारी बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स 98 अंकांनी घसरून 53416 वर आणि निफ्टी 28 अंकांनी घसरून 15939 वर बंद झाला. निफ्टी बँक 177 अंकांनी घसरून 34,651 वर बंद झाला. तर मिडकॅप 24 अंकांनी घसरून 27,804 वर बंद झाला.
गुरुवारी सर्वाधिक खरेदी एनर्जी आणि फार्मा शेअर्समध्ये दिसून आली. त्याचवेळी बँकिंग, आयटी शेअर्समध्येही विक्री झाली. निफ्टीचे 50 पैकी 29 शेअर्स घसरले. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्सवर दबाव राहिला.
हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?
गुरुवारी भारतीय बाजारांनी कमकुवत जागतिक संकेतांमुळे सुरुवातीची नफा गमावला आणि शेवटी लाल चिन्हात बंद झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. अपेक्षेपेक्षा जास्त अमेरिकी चलनवाढीचे आकडे बाजारात येण्याची भीती होती, ज्याचा परिणाम स्पष्ट दिसून आला आणि आजही बाजारात त्याचा परिणाम कायम राहील.
हेही वाचा: हे 'दोन' शेअर्स देतील तगडा परतावा, दिग्गजांना विश्वास...
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
ओएनजीसी (ONGC)
डॉ.रेड्डी (DRREDDY)
कोटक बँक (KOTAKBANK)
मारुती (MARUTI)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
एचसीएल टेक (HCLTECH)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)
टेक महिन्द्रा (TECHM)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
Web Title: Share Market Opening Update 15 July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..