आजपासून राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय गुरुवारी महाराष्ट्र सरकारनी घेतला.
Check Today's Petrol Diesel Price Updates
Check Today's Petrol Diesel Price Updates esakal

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय गुरुवारी महाराष्ट्र सरकारनी घेतला. पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आता सर्वसामान्यांना होणार आहे. (Petrol-Diesel Price Update)

केंद्राने दीड महिन्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील कर 8 आणि 6 रुपयांनी कमी केले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.आता पुन्हा पेट्रोलच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.

Check Today's Petrol Diesel Price Updates
बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर राज्यात लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आज मुंबईत पेट्रोल 106.25 तर, डिझेल 94.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. गुरुवारी मुंबईत पेट्रोलची किंमत 111.30 रुपये तर डिझेलची किंमत 97.22 रुपये प्रति लिटर होती.

Check Today's Petrol Diesel Price Updates
हे 'दोन' शेअर्स देतील तगडा परतावा, दिग्गजांना विश्वास...

राज्यातील काही महत्त्वाच्या शहरातील नवे दर

  • मुंबईत पेट्रोल 106.25 तर, डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर

  • नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे.

  • पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर

  • नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर

  • कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर

Check Today's Petrol Diesel Price Updates
NSEच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना EDकडून अटक

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com