Share Market: Sensex अन् Nifty मध्ये अस्थिरता, गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Update

Share Market: Sensex अन् Nifty मध्ये अस्थिरता, गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम

Share Market: शेअर बाजार सोमवारी तेजीसह बंद झाला. मात्र आज शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार वधारल्याचे दिसून आले. त्यानंतर शेअर बाजार निगेटिव्ह मध्ये गेला.

आज जवळपास 22 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर 28 शेअर्समध्ये घसरण आहे. आज दिवसभर शेअर्समध्ये चढ उतार दिसून येईल. त्यामुळे शेवटपर्यंत गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम राहणार. (share market opening update 2 august 2022 )

हेही वाचा: Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

सोमवारी बाजारात तेजी होती. चागंले जागतिक संकेत, जून तिमाहीचे चांगले निकाल आणि मजबूत वाहन विक्री आकड्यांमुळे बाजारातील सकारात्मक वातावरण होते. याशिवाय जुलै महिन्यातील मजबूत जीएसटी कलेक्शन आणि पीएमआयच्या आकडेवारीत झालेली वाढ यामुळेही बाजाराला सपोर्ट मिळाला.

सोमवारी व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 545.25 अंकांच्या म्हणजेच 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 58,115.50 वर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी 181.80 अंकांच्या म्हणजेच 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 17,340.05 वर बंद झाला होता.

हेही वाचा: Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

बाजाराच्या नजरा आता आरबीआयच्या धोरणावर असतील. FII च्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार खूश आहेत. निफ्टी 200 दिवसांच्या SMA वर आहेआणि इंट्राडेमध्ये हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन कायम आहे. आता बाजार ओव्हरबॉट झोनमध्ये दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात इंट्राडेमध्ये करेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Share Market : टेक्सटाइल सेक्टरमधला 'हा' शेअर देईल तगडा परतावा...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
एसबीआय लाईफ (SBILIFE)
टाटा स्टील (TATASTEEL)
हिन्दाल्को (HINDALCO)
सनफार्मा (SUNPHARMA)
कोल इंडिया (COALINDIA)
आयआरसीटीसी (IRCTC)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
एमफॅसिस (MPHASIS)

Web Title: Share Market Opening Update 2 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..