Share Market Today: आयटी अन् बँकीग शेअर्स तेजीत, शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Share Market News Updates

Share Market Today: आयटी अन् बँकीग शेअर्स तेजीत, शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला

आठवड्याभरापासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. मात्र आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत दिसून येत आहे. तरीसुद्धा दिवसभरात शेअर्समध्ये होणाऱ्या चढउताराकडे आज सर्वांचे लक्ष राहील.

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 55 अंकाच्या तेजीसह 62,327 वर सुरू झाला तर निफ्टी 44.35 अंकाच्या तेजीसह 18.528 वर सुरू झाला. आज 26 शेअर्समध्ये तेजी तर 23 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

नोव्हेंबर एक्स्पायरीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी बाजारात रेकॉर्ड क्लोझिंग झाली. सेन्सेक्स आणि बँक निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 762 अंकांनी वाढून 62273 वर बंद झाला तर निफ्टी 217 अंकांवर वाढून 18484 च्या पातळीवर बंद झाला.

आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने गुंतवणूकदारांमध्ये शेवटच्या सत्रापर्यंत धाकधूक कायम राहील. आज आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर गुरुवारी आयटी आणि सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली होती. याशिवाय मेटल, रियल्टी आणि फार्मा शेअर्समध्येही वाढ झाली.

हेही वाचा: Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

तांत्रिक दृष्टिकोनातून निफ्टीने डेली चार्टवर एक मोठी बुलिश कँडल तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.  शिवाय ते डेली आणि इंट्राडे चार्टवर हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन राखत आहे, जे सकारात्मक संकेत आहेत.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
बीपीसीएल (BPCL)
इन्फोसिस (INFY)
टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
एल अँड टी टेक सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
ज्युबिलंट फुड्स (JUBLFOOD)
ए यू बँक (AUBANK)