Share Market Opening : शेअर बाजारात 'अच्छे दिन'; सेन्सेक्स-निफ्टीने गाठला उच्चांक

सेन्सेक्स, निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला
share market update
share market updategoogle

काल (सोमवारी) शेअर बाजाराने उच्चांकी भरारी घेतली. त्यानंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स, निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आज सकाळच्या सत्रात निफ्टीमध्ये किंचीत घसरण दिसून आली होती. त्यानंतर काही वेळातच निफ्टीने उच्चांक गाठला आहे. सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 240 अंकांच्या तेजीसह 62,745 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक 62,724 गाठला आहे. तर, निफ्टी 70 अंकांच्या तेजीसह 18,619 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीने 18,631हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीला 18400 आणि 18300 वर चांगला सपोर्ट असल्याचे शेअर खानचे गौरव रत्न पारखी म्हणाले. जोपर्यंत निफ्टी या सपोर्ट झोनच्या वर राहील, तोपर्यंत त्यात तेजी येण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 18400 आणि नंतर 18900 च्या दिशेने जाताना दिसेल.

जागतिक चिंता असूनही भारतीय बाजारात स्थिर वाढ दिसत असल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. भारत यापुढेही इतर बाजारांना मागे टाकत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कंपन्यांच्या मजबूत कामगिरीचा आणि मागणीत वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्था आणि बाजार या दोघांनाही फायदा होईल.

सध्या आयटी, ऑटो आणि बँकिंग सेक्टर्स चांगले दिसत आहे. निफ्टीसाठी 18450 वर सपोर्ट दिसत आहे, तर 18650 वर रझिस्टंस दिसत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 42500 वर समर्थन आहे. 45350 वर सपोर्ट तर 45350 वर रझिस्टंस आहे.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बीपीसीएल (BPCL)
रिलायन्स (RELIANCE)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
टाटा कंझ्युमर (TATACONSUM)
एसबीआय लाईफ (SBILIFE)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
एमआरएफ (MRF)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
व्होल्टास (VOLTAS)

share market update
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com