Share Market Opening: शेअर बाजारात सकारात्मकता; सेन्सेक्स 105 अंकांनी वधारला

भारतीय शेअर बाजाराची सुरवात आज तेजीसह झाली
Stock Market Opening
Stock Market Openingesakal

भारतीय शेअर बाजाराची सुरवात आज तेजीसह झाली आहे. काल दिवसभरात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 105 अंकांच्या तेजीसह 62,190 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 25 अंकांच्या तेजीसह 18,518 अंकांवर व्यवहार करत आहे. सकाळच्या सत्रात 30 शेअर्स तेजीत दिसून येत आहेत तर 20 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने गेल्या आठवड्यात शॉर्ट टर्म कंसोलिडेशनच्या टप्प्यात प्रवेश केला होता. यामुळे सोमवारी निफ्टीमध्ये गॅप-डाउन ओपनिंग दिसली. निफ्टी 18300 वर शॉर्ट टर्म सपोर्टकडे घसरला तेव्हा बुल्सकडून सपोर्ट मिळाला.

मात्र सोमवारची रिकव्हरी 18500 च्या जवळ पोहोचल्याने रखडली. निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 18300-18650 दरम्यान कंसोलिडेशनचा साक्षीदार होऊ शकतो. तर दुसरीकडे बँक निफ्टीमध्ये पॉझिटीव्ह मोमेंटम कायम आहे.

Stock Market Opening
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

सुरुवातीला घसरण झाल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीने सोमवारी त्यांचे बहुतांश नुकसान भरून काढल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. पण जवळपास संपूर्ण ट्रेडिंग सत्रात बाजाराने एका रेंजमध्ये व्यवहार केला.

या आठवड्यातील यूएस फेडच्या बैठकीतील निर्णय आणि चलनवाढीच्या आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदार बहुतेक साईडलाइन राहतील. यूएस फेडच्या बैठकीच्या निर्णयानंतरच बाजाराची दिशा स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एशियन पेंट्स (ASIANPAINT)
इन्फोसिस (INFY)
कोटक बँक (KOTAKBANK)
टायटन (TITAN)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
डिक्सन (DIXON)
एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)
ऍस्ट्रल (ASTRAL)

Stock Market Opening
Gold Rate : खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com