Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने ओलांडला 60 हजार अंकांचा टप्पा

सेन्सेक्स निफ्टीच्या वरच्या श्रेणीत व्यवहार करत आहे
Share Market Updates
Share Market Updatessakal

आजही शेअर बाजारात तेजी कायम आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाले होते. पण या आठवड्याच्या सुरवातीपासूनच शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात आज मोठी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स निफ्टीच्या वरच्या श्रेणीत व्यवहार करत आहे.आज शेअर बाजाराच्या सुरवातीला 138 अंकांनी तेजीसह सुरू होऊन 59,980 वर गेला तर निफ्टी 49 अंकाच्या तेजीसह 17,873 वर सुरू झाला.

सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा गाठला आहे . जवळपास चार महिन्यानंतर सेन्सेक्स 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडणार आहे.

तर जुलैमध्ये घाऊक महागाई दरात घट झाल्याने बाजारातील भावनांना चालना मिळाली. मंगळवारी बाजारात मेटल आणि पीएसयू बँका वगळता सर्वच क्षेत्रात खरेदी दिसून आली. व्यवहाराअंती सेन्सेक्स 379.43 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 59,842.21 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 127.10 अंकांच्या किंवा 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 17,825.30 वर बंद झाला.

Share Market Updates
बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

बीपीसीएल (BPCL)

मारुती (MARUTI)

हिंदूस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

एमआरएफ (MRF)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

लॉरस लॅब (LAURUSLABS)

Share Market Updates
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण; उच्चांकी किमतीपेक्षा ४ हजारांनी स्वस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com