
Share Market: कसा असेल आजचा शेअर बाजारातला दिवस? कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे शुक्रवारी शेअर बाजार जवळपास 2 टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स 1,141.78 अंकांनी अर्थात 1.95 टक्क्यांनी घसरून 57,197.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 303.65 अंकांच्या म्हणजेच 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17,172 वर बंद झाला.
मे मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हने दर वाढवल्यानंतर, बॉन्ड यील्ड वाढ, मिश्र तिमाही निकाल आणि रशिया-युक्रेनमधील परिस्थती आणखी बिघडल्याने शेअर बाजार लाल रंगात बंद झाला.
सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर लक्षात येईल की निफ्टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 5.6 टक्के आणि निफ्टी मीडिया इंडेक्स 4 टक्क्यांनी घसरला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी बँक इंडेक्स प्रत्येकी 4 टक्क्यांनी घसरले. निफ्टी ऑटो इंडेक्स 3 टक्क्यांनी, निफ्टी एनर्जी आणि ऑइल अँड गॅस 2.4 टक्क्यांनी वाढले.
बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.1 टक्क्यांनी घसरला, स्मॉलकॅप इंडेक्स 0.9 टक्क्यांनी घसरला आणि लार्जकॅप इंडेक्समध्ये 1.7 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 749 अंकांनी घसरला, तर निफ्टी 17,171.95 वर बंद
एफआयआयची विक्री सुरूच-
गेल्या आठवड्यात, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 18,443.81 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 14,394.37 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. एफआयआयने एप्रिलमध्ये आतापर्यंत 29,206.19 कोटी रुपयांची इक्विटी विकली, तर डीआयआयने 20,166.48 कोटी रुपयांची इक्विटी खरेदी केली आहे.
या आठवड्यात निफ्टीची वाटचाल कशी असेल?
बाजाराचा शॉर्ट टर्म टेक्स्चर हा नॉन-डायरेक्शनल असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. सध्या 17,280 च्या ब्रेकआउटनंतरच बुल्स साठी नवीन पुलबॅक रॅली शक्य आहे. असे झाल्यास, याच्या वर इंडेक्स 17,400-17,550 पर्यंत जाऊ शकतो. निफ्टी 200-दिवसांच्या सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली म्हणजेच 17200 च्या खाली व्यवहार करतो, तोपर्यंत सुधारणा चालू राहण्याची शक्यता आहे. याच्या खाली, निफ्टी 17,000-16,800 पर्यंत घसरू शकतो.
हेही वाचा: गुंतवणूकदार मालामाल; HDFC विलीनीकरणाने तेजी
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)
एचसीएल टेक (HCLTECH)
आयटीसी (ITC)
मारुती (MARUTI)
ॲस्ट्रल (ASTRAL)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
पर्सिस्टेंस सिस्टम्स (PERSISTENT)
पेज इंडिया (PAGEIND)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Pre Open Analysis Nifty And Sensex Prediction
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..