
Share Market: बाजार सुरु होण्यापूर्वी जाणून घेऊया, आज कोणते 10 शेअर्स करतील टॉप परफॉर्म
मंगळवारी सुरुवातीची तेजी गमावत बाजार लाल चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स 236.00 अंकांनी अर्थात 0.43 टक्क्यांनी घसरून 54052.61 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 89.50 अंकांनी म्हणजेच 0.55 टक्क्यांनी घसरून 16,125.2 वर बंद झाला.
अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि वाढत्या व्याजदराच्या चिंतेने जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. देशांतर्गत बाजारपेठेतील सर्व महत्त्वाच्या सेक्टर्सवरवर दबाव होता, इंधन दरात कपात आणि स्टील कस्टम ड्युटीमध्ये वाढ झाल्यामुळे वाहन शेअर्समध्ये वाढ झाली.
हेही वाचा: Share Market: किरकोळ घसरणीसह शेअर बाजार सुरु; सेन्सेक्स 221 तर निफ्टी 64 अंकांनी घसरला
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
मंगळवारी सुरुवातीला काही प्रमाणात खरेदी दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या श्रीकांत चौहान यांनी म्हटले. पण युरोपमधील कमकुवत आकडेवारी आणि आशियाई बाजारातील कमजोरी यामुळे बाजारावर परिणाम झाला. आता गुंतवणूकदारांची नजर यूएस FOMC बैठकीमधील मिटींग मिनिट्सवर आहे. यावरून यूएस फेडची दर वाढीची दिशा स्पष्ट होईल. नजीकच्या काळात व्याजदरात होणारी संभाव्य वाढ आणि त्याचा विकासावर होणाऱ्या परिणामांवर गुंतवणूकदारांची नजर आहे.
निफ्टीने डेली चार्टवर बियरिश कँडल तयार केली आहे, जे कमजोरीचे लक्षण आहे. जोपर्यंत निफ्टी 16250 च्या खाली आहे. तोपर्यंत दबाव कायम राहणार आहे. जर निफ्टीने ही पातळी डाउनसाइडवर तोडली, तर तो 16000-15050 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टीने 16250 च्या वर ब्रेकआउट दिला, तर तो 16,325-16,375 वर जाताना पाहू शकतो.
हेही वाचा: म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
डॉ. रेड्डी (DR.REDDY)
एचडीएफसी (HDFC)
कोटक बँक (KOTAKBANK)
पॉवरग्रीड (POWERGRID)
एचडीएफसी बँक (HDFCBANK)
डिवीस लॅब (DIVISLAB)
टेक महिन्द्रा (TECHM)
ग्रासिम (GRASIM)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
हिंदाल्को (HINDALCO)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Prediction Best Stock To Buy Today Ss01
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..