बुधवारी क्रेडिट पॉलिसीनंतर बाजारात अस्थिरता दिसून आली. सलग चौथ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 214.85 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरून 54,892.49 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 74.70 अंकांनी किंवा 0.46 टक्क्यांनी घसरून 16,341.65 वर बंद झाला.
आरबीआयने रेपो रेट 0.50 टक्क्यांनी 4.9 टक्क्यांनी वाढवला आहे, पण आरबीआयने आपली अनुकूल भूमिका बदलली आहे, याचा अर्थ पुढील व्याजदर आणखी वाढू शकतात. याशिवाय, आर्थिक वर्ष 2023 साठी महागाईचा अंदाज वाढल्यानेही बाजारात अस्थिर वातावरण कायम होते.
वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आपल्याला आधीच पावले उचलावी लागतील याची जाणीव RBI ला असल्याचे
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. RBI ने आर्थिक वर्ष 2023 साठी महागाईचा अंदाज 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे आरबीआयने सीआरआर वाढवलेला नाही. अर्थव्यवस्थेची वाढ 7.2 टक्क्यांच्या मजबूत पातळीवर राहण्याचा अंदाज आहे.
आता आरबीआयचे धोरण जुनी गोष्ट झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. बाजाराची नजर आता जागतिक संकेत आणि आगामी मॅक्रो इकॉनॉमिक डेटावर असेल. पुढे जाऊन, इंडेक्समध्ये मंदी दिसू शकते, त्यामुळे मार्केटमध्ये सावध दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला अजित मिश्रा यांनी दिला.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
टाटा स्टील (TATA STEEL)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
टायटन (TITAN)
डॉ. रेड्डी (DR REDDY)
बीपीसीएल (BPCL)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
आयटीसी (ITC)
रिलायन्स (RELIANCE)
युपीएल (UPL)
एशियन पेन्ट्स (ASIANPAIN)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.