बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आयटी, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये विक्रीमुळे बाजारावर परिणाम झाला.
Share Market
Share MarketSakal

Share Market: सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला. आयटी, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये विक्रीमुळे बाजारावर परिणाम झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 303.35 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांनी घसरून 53,749.26 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 16,025.80 च्या पातळीवर 99.35 अंक म्हणजेच 0.62 टक्क्यांनी घसरला आहे.

युएस फेडने आर्थिक धोरणे कडक केल्यामुळे अमेरिकेत मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, असा अंदाज जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी वर्तवला. सध्या जागतिक बाजारपेठेची नजर यूएस फेडवर आहे, ज्याचा उपयोग यूएसमध्ये आणखी व्याजदर वाढीचा अंदाज बांधण्यासाठी केला जाऊ शकतो.

Share Market
'या' शेअरचा एका वर्षात 200 टक्के परतावा, आता खरेदी करणं फायद्याचं ठरेल का?

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने डेली चार्टवर थ्री ब्लॅक क्रो पॅटर्न तयार केला आहे, जो भविष्यात बाजारातील कमजोरी कायम राहण्याचा संकेत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे ओम मेहरा म्हणाले. मंथली एक्सपायरीच्या दिवशी आज बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. सगळे मोठे मूव्हिंग एव्हरेज 16300 च्या वर आहेत. MACD आणि RSI सारखे इंडिकेटरही डेली टाईम फ्रेमवर ओव्हरसोल्ड झोनमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. निफ्टीला 15800 वर सपोर्ट आहे. त्याच वेळी, तर 16300 वर रझिस्टंस आहे. बँक निफ्टीला 33500 वर सपोर्ट दिसतो तर डेली चार्टवर 35200 वर रझिस्टंस दिसतोय.

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात मंदी दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर, इंट्राडे चार्टवर निफ्टी गेल्या 3 दिवसांपासून लोअर टॉप फॉर्मेशनमध्ये आहे. याने डेली चार्टवर बियरीश कँडल तयार केली आहे जी पूर्णपणे नेगिटीव्ह आहे.

बाजाराची शॉर्ट टर्म रचना कमकुवत आहे पण ती ओवरसोल्ड असल्याचे श्रीकांत चौहान यांनी म्हटले. 16000 वर ट्रेडर्सना सपोर्ट आहे. जर इंडेक्स या लेव्हलच्या वर गेली तर त्यात 16150-16260 ची पातळीही दिसू शकते. दुसरीकडे, जर तो 16000 च्या खाली घसरला तर ही कमजोरी 15900-15850 च्या पातळीवर जाऊ शकते.

Share Market
या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक

आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

एनटीपीसी (NTPC)

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

भारती एअरटेल (BHARTIARTL)

ओएनजीसी (ONGC)

एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

डिवीस लॅब (DIVISLAB)

युपीएल (UPL)

टेक महिन्द्रा (TECHM)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com