शेअर बाजारात परतली तेजी

पीटीआय
Tuesday, 26 May 2020

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक वाढ दाखवली आहे. काल ईदमुळे शेअर बाजाराला सुट्टी होती असल्याने व्यवहार बंद होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०३ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४६ अंशांची वाढ सकाळच्या सत्रात दिसून आली.

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक वाढ दाखवली आहे. काल ईदमुळे शेअर बाजाराला सुट्टी होती असल्याने व्यवहार बंद होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०३ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४६ अंशांची वाढ सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३०८५९ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९१०१ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टायटन आणि आयटीसी या दोन्ही कंपन्यांच्या शेअच्या किंमतीमध्ये ४ टक्क्यांची वाढ झाली होती. तर एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या किंमतीतसुद्धा २ टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर शेअरमध्ये एचडीएफसीच्या शेअरच्या किंमतीत २ टक्क्यांची वाढ झाली होती.  एचडीएफसीच्या तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तर भारती एअरटेलच्या शेअरच्या किंमतीत मात्र ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारती एअरटेलचे प्रवर्तक भारती टेलिकॉम ब्लॉक डीलच्या माध्यमातून शेअर विक्री करून १ अब्ज डॉलरचे भांडवल उभारणार आहेत. 

भारती एअरटेलचे प्रवर्तक विकणार १ अब्ज डॉलरचा हिस्सा

निफ्टीतील बहुतांश निर्देशांकात सुधारणा दिसून आली. यात निफ्टी मेटल निर्देशांकात सर्वाधिक २ टक्क्यांची वाढ झाली होती. आज जवळपास १९ कंपन्यांच्या तिमाही निकालांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २६16 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

टाटा समूहाकडून वेतन कपात; सीईओ आणि एमडींच्या वेतनात 20 टक्क्यांची कपात

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.25 रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया 75.7000 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

* सेन्सेक्स ३०,८५० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,१०० अंशांच्या पातळीच्या वर 
* निफ्टीमध्ये १०३ अंशांची वाढ
* सेन्सेक्समध्ये ४६ अंशांची वाढ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market reports rise in sensex & nifty