esakal | शेअर बाजारात तेजीची हवा कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

आज आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने तेजी दाखवली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७२ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २५१ अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली.

शेअर बाजारात तेजीची हवा कायम

sakal_logo
By
पीटीआय

आज आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने तेजी दाखवली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७२ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २५१ अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३०,८२६ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,१०० अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे. निफ्टी सध्या ९,००० ते ९,२०० अंशांच्या पातळीवर स्थिरावताना दिसतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बायोकॉनचा शेअर ३६३ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. बॅंक निफ्टीमध्ये आज चांगलीच तेजी दिसून येते आहे. बॅंक निफ्टीने ५५० अंशांची उसळी घेतली आहे. याशिवाय धातू, रिअॅल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या  शेअरच्या किंमतीत चांगलीच तेजी दिसून येते आहे. याउलट एफएमसीजी क्षेत्रातील शेअरच्या किंमतीमध्ये मात्र घसरण झालेली दिसून आली. फार्मा कंपन्यांमध्ये बायोकॉनच्या शेअरच्या किंमतीत १.२५ टक्क्यांची तेजी दिसून आली. याशिवाय दिपक नायट्रेटच्या शेअरमध्येही तेजी होती.

शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद; निर्देशांक सेन्सेक्समध्ये 375 अंशांची वाढ

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये काहीशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २५६४ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

हेही वाचा : कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात​

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी सुधारणा झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.०२ रुपयांनी वधारला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.६८ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

* सेन्सेक्स ३०,८२६ अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,१०० अंशांच्या पातळीच्या वर 
* निफ्टीमध्ये ७२ अंशांची उसळी
* सेन्सेक्समध्ये २५१ अंशांची उसळी