Share Market : देशातील सर्वात मोठ्या फायनान्स कंपनीची घोषणा; मिळणार 'एवढा' टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market : देशातील सर्वात मोठ्या फायनान्स कंपनीची घोषणा; मिळणार 'एवढा' टक्के लाभांश

देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसी श्रीराम फायनान्सने 150 टक्के म्हणजेच 15 रुपये प्रति शेअर अंतरिम डिविडेंड (interim dividend) जाहीर केला आहे. श्रीराम फायनान्स ही देशातील एक अग्रगण्य एनबीएफसी कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे भारतात 67 लाखांहून अधिक खासगी आणि कॉर्पोरेट ग्राहक आहेत.

कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत 2022-23 आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरला 150 टक्केलाभांश जारी करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, यासाठी भागधारकांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. यासाठी 4 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

श्रीराम फायनान्स सामान्य माणसाला कर्ज देणारी कंपनी असल्याचे कंपनीचे एमडी आणि सीईओ वाय.एस. चक्रवर्ती म्हणाले, 23 डिसेंबरला बीएसईवर श्रीराम फायनान्सचे शेअर्स 2.85 टक्क्यांनी घसरून 1,300.90 रुपयांवर बंद झाले. तरीही या स्टॉकने एका महिन्यात 3 टक्के आणि सहा महिन्यांत 4 टक्के परतावा दिला आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्याच वेळी, एका वर्षात स्टॉक सुमारे 7 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे, शिवाय आता डिव्हीडेंडची घोषणा केल्यानंतर शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता शेअर बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: Share Market : नवीन वर्षात 'हे' 5 शेअर्स करतील तुम्हाला मालामाल; तुमच्याकडे आहेत का?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.