Share Market Tips : आज बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Tips

Share Market Tips : आज बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

Share Market Tips : शुक्रवारी सेन्सेक्स, निफ्टी जवळपास 0.50 टक्क्यांनी घसरून बंद झाले. सेन्सेक्स 237 अंकांनी घसरून 60622 वर बंद झाला, तर निफ्टी 80 अंकांनी घसरून 18028 वर बंद झाला.

मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री झाली. सर्वात मोठी घसरण एफएमसीजी, मेटल, रियल्टी शेअर्समध्ये झाली. फार्मा, इन्फ्रा, ऑटो शेअर्स दबावाखाली राहिले.

दुसरीकडे, बँकिंग, पीएसई शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. निफ्टी बँक 178 अंकांनी वाढून 42507 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 245 अंकांनी घसरून 31100 वर बंद झाला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

भारतीय शेअर बाजारानीे मंदीच्या वातावरणात इतर आशियाई बाजारांच्या तुलनेत कमकुवत कामगिरी केल्याचे कोटक सिक्युरिटीज सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले.

बाजारात कोणताही पॉझिटीव्ह ट्रिगर नसतानाही बाजारावर दबाव दिसून आला. टेलिकॉम आणि रियल्टी शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे बाजारात घसरण झाली. मात्र, बँकिंग, एनर्जी, ऑईल-गॅस क्षेत्रातील निवडक शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने विकली चार्टवर एक लाँग लेग्ड डोझी कॅंडलस्टिक तयार केली आहे जी बाजारातील मंदीचे लक्षण आहे.

आता 18000 किंवा 20-दिवसांचा SMA नजीकच्या काळात निफ्टीला सपोर्ट म्हणून काम करेल. निफ्टीने या पातळीच्या वर टिकून राहिल्यास, 18150-18200 या पातळीकडे वरची वाटचाल पाहायला मिळेल.

हेही वाचा: मल्टी-ॲसेट फंड : गुंतवणुकीचा सुलभ पर्याय

दुसरीकडे, जर निफ्टी 18000 च्या खाली घसरला तर ही घसरण 17850 च्या पातळीपर्यंत जाऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • एशियन पेंट्स (ASIANPAINT)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारतफोर्ज (BHARATFORG)

  • ट्रेंट (TRENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.