Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Tips

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

Share Market Tips : शुक्रवारी बाजार दमदार रिकव्हरीसह वाढत बंद झाला. सेन्सेक्स 303 अंकांनी वाढून 60261 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 98 अंकांनी वाढून 17957 वर बंद झाला.

बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. आयटी, ऑटो आणि रियल्टी इंडेक्सही वाढीसह बंद झाले. फार्मा आणि एफएमसीजी शेअर्स दबावाखाली दिसले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स सपाट बंद झाले. मिडकॅप इंडेक्स 32 अंकांनी घसरून 31,328 वर बंद झाला. बँकिंग शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली आहे, त्यामुळे बँक निफ्टी 289 अंकांनी वाढून 42371 वर पोहोचला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बँक निफ्टी बुल्सने डाउनसाइडवर 41,700 सपोर्ट राखण्यात यश मिळवल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. इंडेक्समध्ये दिवसभर वाढ दिसून आली.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...

मात्र बाजारावर पूर्ण पकड ठेवण्यासाठी बुल्सना 43000 चा टप्पा ओलांडून ताकद दाखवावी लागणार आहे. बाजाराचा अंडरटोन तेजीत राहिला. त्यामुळे जोपर्यंत इंडेक्स 41700 च्या वर टिकत नाही तोपर्यंत ट्रे़डर्सनी घसरणीत खरेदी करावी असे ते म्हणाले.

निफ्टीने विकली चार्टवर डोजी पॅटर्न तयार केला आहे. यावरून बाजारातील अनिश्चिततेची स्थिती दिसून येते. पण, निफ्टी डेली टाईम फ्रेमवर 50 इएमएच्या खाली आहे, जे चालू मंदीच्या ट्रेंडची पुष्टी करते.

निफ्टीचा प्रतिकार 18,300 वर आहे आणि 17,800 वर डाउनसाइडला सपोर्ट आहे. दोन्ही बाजूचे कोणतेही ब्रेकआउट बाजाराची दिशा ठरवेल.

हेही वाचा: काळाचे भान ठेवूया, वेळेवर इच्छापत्र करूया !

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • इन्फोसिस (INFY)

  • ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.