Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

Share Market Tips : बँक ऑफ जपानने जाहीर केलेल्या पॉलिसीनंतर बाजारात उत्साह दिसून आला. सेन्सेक्स, निफ्टी दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाले. सेन्सेक्स 390 अंकांनी वाढत 61046 वर बंद झाला तर निफ्टी 112 अंकांनी वाढत 18 हजार 165 वर बंद झाला.

मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. मेटल शेअर्समध्ये सर्वात जास्त वाढ झाली. त्याचवेळी फार्मा, पीएसई, इन्फ्रा शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

बँकिंग, आयटी शेअर्समध्येही खरेदी झाली. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ऑटो, एनर्जी शेअर्सवर सर्वाधिक दबाव राहिला. निफ्टी बँक 223 अंकांनी वाढून 42458 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 162 अंकांनी वाढून 31379 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बेंचमार्क निर्देशांकात फॉलोअप खरेदीमुळे बाजारात चांगली तेजी दिसून आल्याचे एंजेल वनचे ओशो कृष्णन म्हणाले. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी डेली चार्टवर त्याच्या सर्व इएमएवर ट्रेड करत आहे, जे बाजारासाठी चांगले लक्षण आहे.

आता निफ्टीने 18200 ची पातळी ओलांडून ताकद दाखवली तर त्यात आणखी तेजी येऊ शकते. दुसरीकडे खाली निफ्टीला पहिला सपोर्ट 18050-18100 आणि 18000 वर मोठा सपोर्ट दिसत आहे.

दुसरीकडे, जर निफ्टी 18200-18250 च्या वर जाण्यात यशस्वी झाला तर तो 18400-1850 च्या रेंजमध्ये प्रवेश करेल.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • एल अँड टी (LT)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • विप्रो (WIPRO)

  • ट्रेंट (TRENT)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)

हेही वाचा: Adani Group News : अदानी समूहाचा आणखीन एक मोठा करार, आता 'या' कंपनीतील 50% हिस्सा करणार खरेदी

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.