esakal | Share Market मध्ये मंगळवारची घसरणही ठरणार फायद्याची; तज्ज्ञांचा विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

मंगळवारची शेअर बाजारातील घसरणही ठरणार फायद्याची; तज्ज्ञांचा विश्वास

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मंगळवारी शेअर बाजाराने नफ्यासह सुरुवात केली खरी पण नफा-बुकिंगने मंगळवारी बाजारावर वर्चस्व राहिले आणि शेवटी सेन्सेक्स-निफ्टी लाल मार्काने अर्थात घसरणीवर बंद झाले.

शिल्पा गुजर - मंगळवारी शेअर बाजाराने नफ्यासह सुरुवात केली खरी पण नफा-बुकिंगने मंगळवारी बाजारावर वर्चस्व राहिले आणि शेवटी सेन्सेक्स-निफ्टी लाल मार्काने अर्थात घसरणीवर बंद झाले. मंगळवारी लहान-मध्यम स्टॉक्सही दबावासह व्यापार करताना दिसले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.71 टक्के कमी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.62 टक्क्यांनी बंद झाला. व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 410.28 अंक अर्थात 0.68 टक्क्यांनी घसरून 59,667.60 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 106.50 पॉईंट्सने अर्थात 0.60 टक्क्यांनी खाली 17,748.60 वर बंद झाला.

शेअर बाजारात घसरण का ?
अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बाँडचे उत्पन्न वाढले आहे, जे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारासाठी फायद्याचे नाही. याशिवाय, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड देखील मंगळवारी जवळपास 1% वाढून 80 डॉलरवर पोहोचला, त्यामुळे भारतातील शेअर बाजारावर परिणाम होईल असे मत शेअर बाजारातील विश्लेषकांनी नोंदवले. पण काही शेअर बाजार तज्ज्ञ या घसरणीला चांगले संकेत म्हणून पाहत आहेत. इतर उदयोन्मुख बाजाराच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारात बरीच गती राहिल्याचे एका तज्ज्ञाने सांगितले. त्यामुळेच त्यांच्यामध्ये काही नफा बुकिंग करणे आवश्यक आहे. सणांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरता कायम राहील. सकाळच्या व्यापारादरम्यान, निफ्टी अस्थिरता (Volatality) निर्देशांक 2.7% च्या वाढीसह व्यापार करत होता.

आयटी शेअर्सने यावर्षी सुमारे 82% परतावा दिला असल्याची माहिती बाजार तज्ज्ञांनी दिली. त्यामुळेच या विभागात नफा बुकिंग होताना दिसत आहे. याशिवाय, गुंतवणूकदार चिनी रिअल इस्टेट कंपनी एव्हरग्रँडशी संबंधित घडामोडींवर नजर ठेवून आहेत. चीनमधील उर्जा संकट त्याच्या वाढीवर परिणाम करू शकते अशी गुंतवणूकदारांना भीती आहे. ज्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होऊ शकतो. गोल्डमन सॅक्सने अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनसाठी यापुढे वाढीबाबत साशंकता वर्तवली आहे.

आज अर्थात बुधवारी कोणत्या स्टॉक्सवर नजर ठेवाल ?
शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी काही शेअर्स निवडले आहेत, त्यावर एक नजर टाकुयात.
- डीएलएफ (DLF)
LTP - 399 ते 401 रुपये
टारगेट - 425 रुपये
स्टॉप लॉस - 390 रुपये
- चोला फायनान्स (CHOLA FINANCE)
LTP - 557 ते 559 रुपये
टारगेट - 590 रुपये
स्टॉप लॉस - 548 रुपये
- एल अँड टी (L&T)
LTP - 1725 ते 1728 रुपये
टारगेट - 1830रुपये
स्टॉप लॉस - 1700 रुपये

याव्यतिरिक्त आणखी काही शेअर्स आहेत ज्यावर नक्की नजर ठेवा.
भारती एअरटेस (BHARTIARTL)
टेक महिंद्रा (TECHM)
बजाज फायनान्स (BAJFINANCE)
डिविस लेबोरेटोरी (DIVISLAB)
बजाज फिनसर्व लिमिटेड (BAJAJFINSV
पॉवर ग्रीड (POWERGRID)
कोल इंडिया (COALINDIA )
एनटीपीसी (NTPC)
सनफार्मा (SUNPHARMA )
आयओसी (IOC)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top