Share Market : आज कोणते १० शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : आज कोणते १० शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

सोमवारी बाजार दिवसाच्या उच्च पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारत ५९२४६ वर तर निफ्टी १२६ अंकांनी चढत १७६६६ वर बंद झाला. सोमवारच्या बाजारात तेल-गॅस वगळता बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकात तेजी होती. मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये खरेदी दिसली. कंझ्युमर गुड्स आणि बँकिंग शेअर्सही वधारले.

सेन्सेक्स ४४३ अंकांनी वाढून ५९२४६ वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी १२६ अंकांनी वाढून १७६६६ वर बंद झाला. निफ्टी बँक ३८५ अंकांनी वाढून ३९८०६ वर बंद झाला. तर मिडकॅप १२० अंकांनी वाढून ३१५२२ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी २३ शेअर्स वधारले. निफ्टीमधील ५० पैकी ३६ शेअर्स वधारले. निफ्टी बँकेचे १२ पैकी १२ शेअर्स वधारले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे येत्या ट्रेडिंग सत्रात बाजार अस्थिर राहू शकेल असा बाजार तज्ज्ञांचा अंदाज असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्यामुळे सोमवारी बाजार सावध तेजीत दिसला. तांत्रिक दृष्टीकोनातून, बाजारात २०-दिवसांच्या SMA जवळ पॉझिटीव्ह कंसोलिडेशन दिसत आहे. आता १७५५० च्या आसपास निफ्टीला सपोर्ट दिसत आहे. याच्या वर टिकून राहिल्यास, १७७५०-१७८०० कडे जाऊ शकतो. दुसरीकडे, जर ते १७५५० च्या खाली घसरले तर ही घसरण १७४५०-१७४०० पर्यंत जाऊ शकते.

देशांतर्गत बाजारज सर्व प्रतिकूल जागतिक संकेतांकडे दुर्लक्ष करत आहे आणि हेच मजबुतीचे संकेत असल्याचे एंजल ब्रोकिंगचे समीत चव्हाण म्हणाले. मात्र, सोमवारी सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात फॉलोअप ऍक्शन दिसले नाही. निवडक शेअर्समध्ये ऍक्शन दिसली. जर जागतिक बाजारातून थोडासा पाठिंबा मिळाला तर भारतीय बाजारात मोठा ब्रेकआउट दिसू शकतो.

आजचे टॉप १० शेअर्स कोणते ?

  • हिंदाल्को (HINDALCO)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • एनटीपीसी (NTPC)

  • आयटीसी (ITC)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)

  • डिक्सन (DIXON)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • टीवीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • ए यू बँक (AUBANK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share Market